शिरपूर पोलिसांनी पकडला जनावरांचा ट्रक

By Admin | Updated: June 11, 2017 00:24 IST2017-06-11T00:24:10+5:302017-06-11T00:24:10+5:30

गोपनिय माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे ४ वाजता शिरपूर पोलिसांनी आबई फाट्यावर जनावराने भरलेला ट्रक पकडला.

Animal truck caught in Shirpur Police | शिरपूर पोलिसांनी पकडला जनावरांचा ट्रक

शिरपूर पोलिसांनी पकडला जनावरांचा ट्रक

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गोपनिय माहितीच्या आधारे शनिवारी पहाटे ४ वाजता शिरपूर पोलिसांनी आबई फाट्यावर जनावराने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत १० लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर येथून जनावरांनी भरलेला ट्रक शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार असल्याची गोपनिय माहिती शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांना शुक्रवारी रात्री मिळाली. त्यानुसार, सदर ट्रक पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. शुक्रवारी रात्री योगेश ढाले, उल्हास कुरकुटे, प्रमोद जुनूनकर, शालिक वाघाये या पोलीस कर्मचाऱ्यांनी चारगाव चौकी येथे तर संतोष उघडे मारोती पाटील या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आबई फाट्यावर पहारा लावला. शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास एक ट्रक (क्रमांक एम.पी.०९-एच.जी.३४१४) आबई फाट्यावर पोहचताच, त्या ट्रकला अडवून पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये २२ गाई, दोन बैल व आठ लहान गोरे आढळून आले. या जनावरांची किंमत ८० हजार रुपये आहे. पोलिसांनी लगेच ट्रकमधील मो.मलिक मो.हबीब खान, शशिद अली रशिद अली सय्यद, रईस चॉंद खॉं पठाण, चंदन उमरावसिंग पुष्पक सर्व रा.सारंगपूर (जि.राजगड मध्यप्रदेश) यांना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे पोलीस निरीक्षक सागर इंगोले, योगेश ढाले, उल्हास कुरकुटे, प्रमोद जुनूनकर, शालिक वाघाये, संतोष उघडे, संजय खांडेकर आदींनी केली.

 

Web Title: Animal truck caught in Shirpur Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.