शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

अन् उमरखेडमध्ये डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, हॅन्ड ग्लोब्ज, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य खरेदी केले.

ठळक मुद्देशस्त्राविना कोरोनाशी लढाई : इनरव्हील क्लबने केली मदत, पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्क, सॅनिटायझर उपलब्ध

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी शस्त्राविना कोरोनाशी लढा देत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने दखल घेवून या सर्वांसाठी विविध साहित्याची उपलब्धता करून दिली. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, हॅन्ड ग्लोब्ज, मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य खरेदी केले. हे साहित्य वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश मांडन, डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या सुपूर्द केले.यावेळी डॉ.यादवराव राऊत, डॉ.विमल राऊत, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष जयमाला लाडे, कुसूम गिरी, सुमन हस्तरकर, वैशाली धोंगडे आदी उपस्थित होत्या. इनरव्हील क्लबने आारेग्य कर्मचाऱ्यांची समस्या लक्षात घेवून त्यांना साहित्य भेट दिले. यामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी भारावून गेले. हे साहित्य स्वीकारताना डॉक्टर व आरोग्य कर्मचाºयांच्या डोळ्यात नकळत अश्रू तरळले. समाजाने आपली दखल घेतल्याची भावना त्यांच्या चेहºयावर दिसून आली.जनतेची काळजीतब्बल १०० डॉक्टर व आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून जनतेची काळजी घेत आहे. मात्र त्यांच्याकडे कुणाचे लक्ष नाही. तथापि ते प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहे. इनरव्हील क्लबने त्यांची दखल घेतल्याबद्दल या सर्वांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर