शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...अन् तंत्राला झाला जाणीवेचा स्पर्श !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 10:20 PM

पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच.

ठळक मुद्देजीवन न्याहाळणारा छायाचित्रकार : भांबराजाच्या प्रशांतची आता चेन्नईपर्यंत भरारी

शिवानंद लोहिया।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : पेराल ते उगवतेच. दु:ख सोसणारा माणूस कलावंताचे काळीज बाळगणारा असेल तर त्याच दु:खातून सुखाचे चित्र रेखाटतो. प्रशांत बनकर हा युवा छायाचित्रकार त्यातलाच. बालवयातून ब्रेड विक्री, झाडूपोछा करता-करता त्याला जगण्याकडे बघण्याची ‘नजर’ लाभली. अंत:करणाला डोळे फुटले. अशाच अजाणत्या क्षणी हाती कॅमेरा आला अन् तंत्राला जाणीवेचा स्पर्श झाला... आज निष्णात फोटोग्राफर म्हणून नावाजलेल्या या युवकाची कहाणी खास जागतिक छायाचित्र दिनानिमित्त...प्रशांतचा प्रवास भांबराजातून सुरू झाला. घरातअठराविश्व दारिद्र्य. वडील शेती करून गावात सायकलवर भांडी विकायचे. शेतीत फारसे उत्पन्न येत नव्हते. प्रशांतने शिक्षण घेऊन जीवनात वेगळे काही तरी करून दाखविण्याची जिद्द बाळगली. पण पैशांची चणचण अडथळा ठरत होती. म्हणून तो भांब, बेचखेडा, चांदापूर, हिवरी या गावांमध्ये दररोज सकाळी ब्रेड विकायचा. त्या मिळकतीतूनच शिक्षण सुरू ठेवले. भांबमध्ये सातवी झाल्यावर यवतमाळला जाऊन त्याने बीए केले. त्याचवेळी कामाचा शोध घेताना त्याला श्रीराम फोटोचे मनोज बुरकर यांनी मदतीचा हात दिला. फोटोग्राफीचे प्रशिक्षण दिले.अपघाताने फोटोग्राफीच्या क्षेत्रात आलेला प्रशांत आता आपल्या कलेत निपुण बनलाय. त्याच्या फोटोग्राफीची झेप थेट चेन्नईपर्यंत पोहोचली आहे. कलात्मक छायाचित्रांमध्ये तज्ज्ञ झालेल्या प्रशांतने दहा हजारांच्या कॅमेºयापासून सुरू केलेला प्रवास आता ७ लाखांच्या कॅमेºयापर्यंत आला आहे. बदलत्या काळासोबत फोटोग्राफीही बदलली. प्रशांत म्हणतो, ‘आता फोटोग्राफीमध्ये गुप्तता राहिली नाही. तत्काळ रिझल्ट मिळतो. पूर्वी पूर्ण प्रक्रिया केल्याविना रिझल्ट कळत नव्हता. मात्र आज कलावंतांना भरपूर वाव आहे. असे असले तरी करिअर म्हणून हे क्षेत्र आजही तेवढेच आव्हानात्मक आहे. नोकरीची वाट पाहण्यापेक्षा अशी कला अवगत केल्यास रोजगारही मिळू शकतो.’उत्तम कलावंत होण्यासाठी उत्तम माणूस असणे आवश्यक आहे. जगताना मिळणारे वाईट अनुभवच चांगली कला घडविण्यासाठी उपयोगी ठरतात. मी लहानपणापासून पाहिलेला संघर्ष आज फोटो टिपताना त्या-त्या क्षणाचे महत्त्व समजण्यास फायदेशीर ठरतोय.- प्रशांत बनकर, छायाचित्रकार