शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या ऑनलाईन नोंदणीत अमरावती विभाग शेवटून पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:06 IST

लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे.

ठळक मुद्देलसीकरणात खोडा राज्याची सरासरी ७४ टक्के, ठाणे ५० वर थबकले

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे. नोंदणी झाली नसलेल्या बालकांचे लसीकरण विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राज्याची वर्षभरातील सरासरी नोंदणी ७४ टक्के इतकी आहे. यात अमरावती विभाग शेवटून पहिला आहे. माता नोंदणीतही या विभागाची स्थिती अशीच आहे.ऑनलाईन नोंदणी झाल्यास कोणत्या बालकाचे लसीकरण झाले, कोणत्या लसी दिल्या याची माहिती सहज उपलब्ध होते. राहिलेल्या बालकांना बोलावून घेत लसीकरण करता येते. कोणत्या लसीचा स्टॉक करावा लागतो याची कल्पना येते. पालकांकडून ही काळजी घेतली जाते. परंतु साठा नसल्यास पर्याय राहात नाही. यासाठी ऑनलाईन नोंदणी घेतली जाते. मात्र ऑनलाईन नोंदणीची कामे सोपविलेल्या संस्थांच्या कामाची गती अतिशय कमी आहे.१ एप्रिल २०१८ ते ८ एप्रिल २०१९ या कालावधीत ३६ जिल्ह्यात तेरा लाख १७ हजार ५१ बालकांची नोंदणी करायची होती. यातील नऊ लाख ७३ हजार दहा इतकीची नोंदणी करण्यात आली आहे. ही सरासरी ७४ टक्के इतकी आहे. यात सर्वात मागे ठाणे जिल्हा आहे. या जिल्ह्याने केवळ ४८ टक्के एवढाच पल्ला गाठला आहे. त्या पाठोपाठ अमरावती विभाग आहे. या विभागातील यवतमाळ ६२, अमरावती ६५, अकोला व बुलडाणा प्रत्येक ६८ टक्के नोंदणी करण्याच यशस्वी झाला. वाशिमने ८० टक्के नोंदणी करून अमरावती विभागाचा टक्का वाढविण्यात हातभार लावला. नोंदणीची कामे काही ठिकाणी संस्थांना दिली आहे, तर काही ठिकाणी आरोग्य विभागाची यंत्रणा करत आहे.ऑनलाईन नोंदणीची कामे स्थानिक पातळीवर दिली जातात. आरोग्य विभागाकडून मर्जीतल्या संस्थाना कामे दिली जातात. अधिकारी आणि संस्था यांच्यात असलेले चांगले संबंधही नोंदणी कमी होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कामे कमी झाल्यास कारवाई अपवादानेच होते. देयकेही कुठलीही शहानिशा न करता काढली जातात. सर्व नियम धाब्यावर बसवून नोंदणीची कामे केली जात आहे. याचा परिणाम बाळाच्या लसीकरणावर होत असल्याचे सांगितले जाते.गोंदिया टॉपवरबाल नोंदणीत ९२ टक्के काम करून गोंदिया जिल्हा टॉपवर आहे. त्या खालोखाल नांदेड, धुळे, नाशिक, लातूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ८१ ते ८७ टक्केपर्यंत नोंदणी याठिकाणी झाली आहे. उर्वरित जिल्हे ८० टक्केच्या खाली आहे. त्यात अमरावती विभाग सर्वात शेवटी आहे. नोंदणी झाली नसलेली बालके क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक लस, गोवरची लस, काविळची लस यापासून वंचित राहण्याची भीती आहे.

टॅग्स :Healthआरोग्य