अॅम्बुलन्स झाडावर आदळली
By Admin | Updated: May 13, 2017 00:24 IST2017-05-13T00:24:07+5:302017-05-13T00:24:07+5:30
दारव्हा मार्गावरील उमर्डा घाटात १०८ रूग्णवाहिकेचा गुरूवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला.

अॅम्बुलन्स झाडावर आदळली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील उमर्डा घाटात १०८ रूग्णवाहिकेचा गुरूवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. यात एक डॉक्टर जखमी झाले. रूग्ण आणि चालकाला मात्र कोणतीच इजा झाली नाही.
डॉ. उमाशंकर अवस्थी, रा. पुसद असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. महागाव तालुक्यातील ब्राम्ही येथील वैजयंता शेषराव लोखंडे (४५) या महिलेचा हात फॅक्चर झाला. तिला उचारासाठी रूग्णवाहिकेने पुसदवरून यवतमाळकडे घेऊन येत असताना विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने साईड न दिल्याने रूग्णवाहिका रस्त्याच्या खाली उतरली.
नंतर चालक सुनील काळे रा. पुसद याचे नियंत्रण सुटल्याने रूग्णवाहिका झाडावर आदळली. यात डॉक्टर अवस्थी जखमी झाले. त्यांच्यावर यवतमाळातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.