रुग्णवाहिकेचे भाडे झाले चक्क उपचार खर्चाइतके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST2020-10-03T05:00:00+5:302020-10-03T05:00:30+5:30

कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्यांंना लूटण्यासाठी अनेक सापळे तयार झाले आहे. त्यातील रुग्णवाहिका हा एक मोठा सापळा आहे. चौपट भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले असून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रुग्णवाहिकेचा व्यवसाय सुरू झाला असून अनेकांनी कंडम झालेल्या रुग्णवाहिका खरेदी करून कुठलीही कागदपत्रे नसताना त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला आहे.

Ambulance fare is as much as the cost of treatment! | रुग्णवाहिकेचे भाडे झाले चक्क उपचार खर्चाइतके !

रुग्णवाहिकेचे भाडे झाले चक्क उपचार खर्चाइतके !

ठळक मुद्देकोविडच्या नावाने लूट : जिल्ह्यात केवळ १५८ रुग्णवाहिका

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रुग्णसेवक म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पुढारी आपल्या नावाने रुग्णवाहिका सुरू करतात. प्रत्यक्षात हा सर्व देखावा असतो रोख रक्कम दिल्याशिवाय रुग्णाला ही वाहिका मिळत नाही. यात सेवाभाव कमी अन् व्यवहार तोही आर्थिक लूट करणारा केला जात आहे. परिवहन विभागात १५८ रुग्णवाहिकांची नोंद आहे. त्यात शासकीय रुग्णवाहिकांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात भंगार रुग्णवाहिका रस्त्यावर असून जीविताशी खेळ सुरू आहे.
कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्यांंना लूटण्यासाठी अनेक सापळे तयार झाले आहे. त्यातील रुग्णवाहिका हा एक मोठा सापळा आहे. चौपट भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले असून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रुग्णवाहिकेचा व्यवसाय सुरू झाला असून अनेकांनी कंडम झालेल्या रुग्णवाहिका खरेदी करून कुठलीही कागदपत्रे नसताना त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला आहे.
कोरोना पूर्वी नागपूरसाठी मारूती व्हॅनचे भाडे ३५०० होते. तर बोलेरोचे भाडे पाच हजार होते. शहरातल्या शहरात पाचशे रुपये भाडे आकारले जात होते. कोरोना काळात पीपीई किट व सॅनिटायझर, आॅक्सीजन खर्च येत असल्याचे कारण पुढे करीत नागपूरसाठी दहा हजार रुपये तर लोकलसाठी दोन हजार रुपये भाडे आकारले जात आहे. हाही दर रास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र काही महाभाग नागपूरला जाण्याकरिता २० हजार रुपये भाडे घेत आहे. लोकलमध्ये दोन हजार रुपयेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे. यातून गंभीर रुग्णाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असून प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
 

Web Title: Ambulance fare is as much as the cost of treatment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.