शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धी दिवाळी उलटली तरी अनेकांना मिळाली नाही रवा, डाळ, साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 20:56 IST

अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी गोरगरिबांच्या घरात पाेहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता. घोषणा झाली मात्र वस्तूंचा पुरवठा झालाच नाही. अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.जिल्ह्याला आणखी साखरेच्या दोन लाख ४२ हजार ९०६ कीट, रव्याच्या तीन लाख १९ हजार ९६१ कीट, चणा डाळीच्या तीन लाख १६ हजार ९०० कीट, पामतेलाच्या ३५ हजार ८७७ कीट, तर रिकाम्या ४१ हजार पिशव्या आवश्यक आहे. या साहित्याला प्राप्त करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.

दुकानदाराच्या तोंडाला फेस१०० रुपयांची कीट घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्या तरी मोजक्याच ग्राहकांना या वस्तू मिळणार असल्याने इतर ग्राहकांकडून दुकानदार टार्गेट झाले.

चार केंद्रांवर पूर्ण माल पोहोचलाचार कीट पैकी एकही वस्तू उपलब्ध झाली असेल तर ती तत्काळ वितरित करा, अशा सूचना असल्याने पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील कळंब, मारेगाव, शेंबाळपिंपरी आणि ढाणकी केंद्रावर कीटमधील काही वस्तू पूर्णत: पोहोचल्या.

दिवाळीनंतर    मिळणार कीट५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना ही कीट मिळाली असली तरी अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक कीट मिळावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. मात्र, कीट पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही कीट अनेक गावांमध्ये पोहोचेल, अशी स्थिती आहे. यातून ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.

लाभार्थी काय म्हणतात...

आम्हाला दिवाळीनंतर कीट मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग हे समजलेच नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आहे. नियोजन नसल्याने सर्वसामान्यांची शोभा सरकारकडून झाली आहे.- मंगला गेडाम, लाभार्थी

अनेक येरझारा मारल्यानंतरही दुकानदारांकडून साहित्य आलेच नसल्याचे सांगितले गेले. सरकारने घोषणा केली नसती तर त्याचे वाईटही वाटले नसते. मात्र, केवळ दिखावा झाला आहे.- संजय आत्राम, लाभार्थी

शेवटच्या ग्राहकापर्यंत वाटपप्रत्येकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेवटच्या ग्राहकापर्यंत याचे वाटप होणार आहे. पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, कुणीही वंचित राहणार नाही. याची संपूर्ण खबरदारी घेतल्या गेली आहे.- सुधाकर पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाDiwaliदिवाळी 2022