गाडी उलटताच १० मिनिटांत दारू रफादफा
By Admin | Updated: May 20, 2016 02:13 IST2016-05-20T02:13:44+5:302016-05-20T02:13:44+5:30
चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू घेऊन जाणारी इंडिगो कार गुरुवारी सकाळी ८ वाजता खैरी-कोसारा दरम्यान उलटली.

गाडी उलटताच १० मिनिटांत दारू रफादफा
चालक पसार : खैरी-कोसाराजवळ अपघात
खैरी : चंद्रपूर जिल्ह्याकडे दारू घेऊन जाणारी इंडिगो कार गुरुवारी सकाळी ८ वाजता खैरी-कोसारा दरम्यान उलटली. गावकऱ्यांना ही बाब कळताच घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गावकरी पोहोचण्यापूर्वीच संबंधितांनी दुसऱ्या वाहनाने दारू चंद्रपूरकडे रवाना केली.
विना नंबरप्लेटची इंडिगो चंद्रपूरकडे निघाली होती. या वाहनात ३०-४० अवैध दारूच्या पेट्या भरलेल्या होत्या. मात्र, कोसारा नजिक वळणावर ही गाडी उलटली. सर्व पेट्या रस्त्यावर पडल्या. मागाहून आलेल्या एका टाटाएस वाहनात या पेट्या भरून अवघ्या दहा मिनिटात सर्व माल रफादफा करण्यात आला. दारूसह इंडिगोचा चालकही पसार झाला. आजूबाजूचे गावकरी घटनास्थळी पोहोचले असता केवळ उलटलेली इंडिगो कार आढळली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना खबर नव्हती. (वार्ताहर)