दारव्हा मार्गावरील सर्वच वाहतूक इतरत्र वळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:42 IST2019-05-22T21:41:37+5:302019-05-22T21:42:00+5:30
शहरातील प्रमुख असलेल्या दारव्हा मार्गावर मतदान मोजणी प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी येथील गर्दी टाळण्याकरिता लाठीवाला पेट्रोलपंप ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता दुतर्फी २३ मे रोजी बंद ठेवला आहे. निकाल लागेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने ही वाहतूक वळविण्यात आली आहे.

दारव्हा मार्गावरील सर्वच वाहतूक इतरत्र वळविली
यवतमाळ : शहरातील प्रमुख असलेल्या दारव्हा मार्गावर मतदान मोजणी प्रक्रिया चालणार आहे. त्यासाठी येथील गर्दी टाळण्याकरिता लाठीवाला पेट्रोलपंप ते रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता दुतर्फी २३ मे रोजी बंद ठेवला आहे. निकाल लागेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. मतमोजणी दरम्यान निवडणूक निकाल जाहीर होणार असल्याने सर्व पक्षाचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने ही वाहतूक वळविण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्र परिसरातील गर्दी टाळण्यासाठी व शांतता सुव्यवस्था कायम राहावी यासाठी वाहतुकीस प्रतिबंध घातला आहे. दारव्हा रोडने नेहमीच्या मुख्य रस्त्यावरून पूर्णत: बंद करून (अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, पोलीस वाहने वगळून) ती वाहने पांढरकवडा बायपास, धामणगाव बायपास, आर्णी बायपास, घाटंजी बायपास, कळंब बायपासने वळविली आहे. २३ मे रोजी सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग हे वापरा
दारव्हा मार्गाने येणाऱ्यांना बसस्थानकाकडे जाण्यासाठी दारव्हा नाका ते बजरंग चौक अथवा क्रिटीकेअर हॉस्पिटलसमोरून आर्णी रोड या मार्गाचा वापर करता येईल.
लोहारा, वाघापूर परिसरातील नागरिकांना बायपासने एसबीआय चौकातून बसस्थानक व शहराच्या इतर भागात जाता येणार आहे. हा पर्यायसुद्धा ठेवला आहे.
निकाल ऐकणाऱ्यांसाठी रेल्वे स्टेशन मैदान राखीव ठेवले आहे. तेथेच वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे.