सर्व ठाणे होणार आॅनलाईन पालकमंत्री : लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

By Admin | Updated: October 4, 2015 00:30 IST2015-10-04T00:30:57+5:302015-10-04T00:30:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा ...

All Thane will be the online Guardian Minister: Inauguration of the Lohara Police Station | सर्व ठाणे होणार आॅनलाईन पालकमंत्री : लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

सर्व ठाणे होणार आॅनलाईन पालकमंत्री : लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन


यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेही महात्मा गांधी जयंतीच्या पर्वावर राज्यात सेवा हमी कायदा लागू करून ४६ सेवा आॅनलाईन केल्या आहेत. याच धर्तीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे टप्प्या-टप्प्याने आॅनलाईन करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरला एमआयडीसी परिसरात लोहारा पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, लोहाराचे सरपंच बबलू देशमुख, वाघापूरचे सरपंच विक्की राऊत, नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य सुमित बाजोरिया, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष सुराणा, माजी अपर पोलीस अधीक्षक सोने, एमआयडीसीचे सह-कार्यकारी अधिकारी रावते आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले की, आजही महाराष्ट्र पोलीसांची गणना स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांसोबत होते. मात्र अपुरे मनुष्यबळ, सततच्या ड्यूटी, वसाहतीचा प्रश्न यामुळे पोलीस बांधव तणावात राहतात. शासनाने पोलिसांवरील तणाव कमी करण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन कामाच्या पद्धतीत बरेच बदल केले आहे. पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आग्रही असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी खासदार भावना गवळी यांनी पोलिसांकडून कधी प्रेमाने तर कधी पोलिसी खाक्याने कामाची अपेक्षा असल्याचे सांगितले. कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी नेहमीच तत्पर असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पोलिसांनी गुन्हेगारांवर नेहमी जरब निर्माण करावी. सामान्य जनतेसाठी मात्र त्यांनी आईच्या भूमिकेत असले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. आभार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मानले. तर सूत्रसंचालन अजित डेहणकर यांनी केले. कार्यक्रमाला उद्योजकांसह, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: All Thane will be the online Guardian Minister: Inauguration of the Lohara Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.