खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:11 IST2017-11-27T22:10:54+5:302017-11-27T22:11:25+5:30

विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ आणि अभ्यास या दोनही गोष्टी महत्वाच्या आहे.

All-round development of students | खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

ठळक मुद्देभुवनेश्वरी एस. : चिचघाट येथे तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळ आणि अभ्यास या दोनही गोष्टी महत्वाच्या आहे. खेळामुळे शारीरिक विकास होतो तर अभ्यासामुळे बौद्धीक विकास होतो, अभ्यासाबरोबर सुंदर हस्ताक्षर म्हणजे परिपूर्ण शिक्षण होय, असे प्रतिपादन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्या प्रकल्प अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चिचघाटचे सरपंच डोमाजी रामगडे, पोलीस पाटील वीरेंद्र राठोड, सहायक प्रकल्प अधिकारी सी.जी. लोखंडे, व्ही.डी. डाखोरे, आदिवासी विकास कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत, जी.बी. तेलंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे, कार्यालय अधीक्षक कोल्हे उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते क्रीडा ध्वज व मशाल पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. श्रीकृष्ण वाघाये यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून मानवंदना दिली. रमेश जिरापुरे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. यावेळी चिचघाट, नांझा, हिवरी येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य केले. तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेत सात केंद्रातील ८५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. संचालन उज्वला रोंघे यांनी तर आभार मुख्याध्यापक सतीश गोळे यांनी मानले.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मदत - पोलीस अधीक्षक
४आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी पोलीस विभागात सेवेची संधी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले. यासाठी पोलीस विभाग विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यसाठी सर्वतोपरी मदत करेल, असे सांगितले.

Web Title: All-round development of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.