सर्व रसात श्रेष्ठ धम्म रस आहे
By Admin | Updated: February 16, 2017 00:20 IST2017-02-16T00:20:58+5:302017-02-16T00:20:58+5:30
मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सर्व दानात जर काही श्रेष्ठ असेल तर धम्मदान श्रेष्ठ आहे.

सर्व रसात श्रेष्ठ धम्म रस आहे
भदंत बुद्धघोष : अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
मुळावा : मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सर्व दानात जर काही श्रेष्ठ असेल तर धम्मदान श्रेष्ठ आहे. सर्व रसात श्रेष्ठ धम्म रस आहे. तेव्हा त्याचे नित्य सेवन केल्याने सुखी जीवनाचा मार्ग मिळतो, असे प्रतिपादन भदंत बुद्घघोष (पुणे) यांनी केले.
ते अखील भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या धम्मदेसनेत बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत धम्मसेवक महाथेरो होते. तर धम्म परिषदेत धम्मदेसना देण्यासाठी भदंत दयानंद महाथेरो, भदंत आनंदबोधी, भदंत आनंद (अकोला), भदंत ध्यायनरसीत (औरंगाबाद), भदंत आनंदबोधी, भदंत शिवली बोधी, भदंत सुभद्रबोधी थेरो, भदंत धम्मधर, भदंत उपाली, भदंत महायोग्यल्यान, भदंत नागसेन, भदंत प्रदानंद, आर्या धम्मदीक्षा, आर्या पारमीता, आर्या बुद्धसेविका, आर्या सुकहोनी उपस्थित होत्या.
सकाळी ५ वाजता ध्यानधारणेने दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली. यात बुद्धवंदना, धम्मवंदना, संघ वंदना परित्राणपाठासह उपस्थित भिख्खु संघाने धम्मदेसना दिली.
दुपारच्या सत्रात धम्मदेसना देताना भदंत बुद्धघोष यांनी ‘मानवी जीवनात दानाचे महत्व’ यावर सविस्तर धम्मदेसना दिली.
प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महाथेरो यांनी प्रास्ताविकासह धम्मदेसना दिली. भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्थेच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)