अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
By Admin | Updated: February 17, 2017 02:34 IST2017-02-17T02:34:07+5:302017-02-17T02:34:07+5:30
भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर व महिला शाखेच्यावतीने येथे १० व ११ मार्च रोजी चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
घाटंजी : भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर व महिला शाखेच्यावतीने येथे १० व ११ मार्च रोजी चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रबोधन, धम्म कविसंमेलन, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत.
१० मार्च रोजी सकाळी ११ वाजता भदन्त सदानंद यांच्या अध्यक्षतेत भदन्त संघरत्न माणके यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदन्त अश्वजित हे ध्वजारोहण करतील. भदन्त बुद्ध घोष, भदन्त धम्मवंश, भदन्त विपश्शी, आर्या सुकेशनी, भिक्खुनी आर्या बुद्धकन्या यांची उपस्थिती राहील. याच दिवशी आंबेडकरी जलसा, गायन आणि प्रबोधनपर कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील धम्मक्रांती या विषयावर मार्गदर्शन होईल. सायंकाळी ५ वाजता धम्म कविसंमेलन, ७ वाजता एकसंज्ञा निळ्या पाखरांची हा कार्यक्रम होणार आहे.
११ मार्चला सकाळी १० वाजता बुद्ध वंदना व धम्मदेसना भिक्खुसंघ देतील. दुपारी १ वाजता भदन्त एन. चंद्ररतन थेरो, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त नागदीपांकर मार्गदर्शन करतील. दुपारी ३.३० वाजता समारोपीय सत्र व सत्कार सोहळा होईल. या कार्यक्रमात नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाईल.
सायंकाळी ७ वाजता ‘अंगुलीमाल’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ७.३० वाजता बुद्ध-भीत गीतांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम होईल. या संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष जीवने, महासचिव सतीश रामटेके, कार्याध्यक्ष अशोक निमसरकर, कोषाध्यक्ष गुलाब सिसले, शहराध्यक्ष डॉ. जयंत गायकवाड, शहर महासचिव प्रा. उत्तम शेंडे, प्रकाश डोंगरे, शेषराव नगराळे, मोतीराम बन्सोड, मुख्य निमंत्रक डॉ. आनंदराव कांबळे, नारायण धोटे, राजू कुंभारे, राजू नारायणे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)