सर्व पात्र शेतकºयांना कर्जमाफी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:28 IST2017-09-06T23:27:58+5:302017-09-06T23:28:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

सर्व पात्र शेतकºयांना कर्जमाफी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सध्या १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तांत्रिक अडचणी असल्यास मुदत वाढविली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
झरी तालुक्यातील निमणी-दाभाडी कोलाम पोड येथे जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांनी आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठित केलेले २०१७ च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहिती यावेळी तिवारी यांनी दिली. घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले स्वतंत्रपणे कर्जमाफीस पात्र असून दिवंगत शेतकºयांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, झरीचे तहसीलदार गणेश राऊत, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी पटवारी, पाटणचे ठाणेदार वाघ, डॉ महेद्र लोढा, धर्मा आत्राम, सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, विलास आत्राम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते .
यावेळी दाभाडी, वरपोड, खडकडोह, पवनार, घोन्सा, पेंढरी, सोनेगाव शिवपोड परिसरातील कोलाम पोडावरील आदिवासींनी जमिनीच्या मालकीचा प्रश्न, घरकूल योजनेच्या अडचणी, शेतकºयांच्या शेतमाल विक्रीसाठी येत असलेल्या अडचणी, नवीन पिककर्ज ,मुद्राकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी, अन्न, आरोग्य, गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण, शिक्षण, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. आदिवासी बहुल भागात सातबारावर वारसाची नावे चढविणे तसेच पिवळ्या शिधा वाटप नाहीत आदी प्रश्न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली. या सर्व समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, असे आदेश शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यांनी यावेळी दिले.