अलर्ट...! कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा जिल्ह्यात हातपाय पसरतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:01+5:30

रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली.

Alert ...! Corona virus is once again spreading in the district | अलर्ट...! कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा जिल्ह्यात हातपाय पसरतोय

अलर्ट...! कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा जिल्ह्यात हातपाय पसरतोय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या दोन महिन्यांत उतरंडीला लागलेला कोरोनाचा संसर्ग मागील आठवड्यापासून पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. रविवारी आणखी चार रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील सक्रिय पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून २२ झाली आहे. दरम्यान रविवारी दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली. 
रविवारी दिवसभरात पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या चार जणांपैकी दोघे यवतमाळ येथील तर घाटंजी येथील एक आणि वणी येथील एक रुग्ण आहे. यात एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार रविवारी एकंदर ३३१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७२ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ७१ हजार १४० रुग्ण कोरोनावर मात करून ठणठणीत झाले आहे. मात्र १७८८ जणांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ६७ हजार ७६६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा लाख ९४ हजार ७३२ चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. सध्या कोरोना पॉझिटिव्हिटी दर ९.५० असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.२१ आहे. तर मृत्यू दर २.४५ आहे. 

यवतमाळ शहरात रात्रीही होणार कोविड लसीकरण 
- वाढत्या कोरोना आणि अत्यल्प झालेले लसीकरण पाहता जिल्हा प्रशासनाने यवतमाळ शहरात रात्रीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वंजारी फैल, लोखंडी पूल, तलाव फैल, पिंपळगाव शाळा, आठवडी बाजार, भोसा रोड, दत्त चौक, समर्थवाडी, बाजोरियानगर, पाटीपुरा, कळंब चौक, अंजुमन शाळा, जफरनगर शाळा, उमरसरा उपकेंद्र, मुलकी उपकेंद्र, जयविजय चौक, लोहारा उपकेंद्र, वाघापूर उपकेंद्र अशा २० ठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  ठेवली जाणार आहे. 

चहुबाजूंनी हल्ला, विविध तालुक्यातून फुगतोय रुग्णांचा आकडा

- २९ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात अचानक एकाच दिवशी नऊ कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे दहाच्या खालील गेलेला सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा दोन अंकी झाला. आता तर दरदिवशी तीन-चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. विशेष म्हणजे रोज आढळणारे रुग्ण कोणत्याही एका ठराविक परिसरातील नाहीत. पाच दिवसांपूर्वी दारव्हा, त्यानंतर पुसद, वणी, घाटंजी अशा वेगवेगळ्या तालुक्यांमधून रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका यवतमाळ जिल्ह्यात चहुबाजूंनी वाढत असल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. 
 

 

Web Title: Alert ...! Corona virus is once again spreading in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.