मद्यपी पतीचा कुऱ्हाडीने खून
By Admin | Updated: December 13, 2014 22:46 IST2014-12-13T22:46:46+5:302014-12-13T22:46:46+5:30
एका मद्यपी पतीचा जाच असह्य झाल्याने संतापाच्याभरात पत्नीनेच कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना राळेगाव तालुक्यातील पार्डी येथे उघडकीस आली. घटनेनंतर त्याचा खून

मद्यपी पतीचा कुऱ्हाडीने खून
पत्नीला अटक : अपघात भासविण्याचा प्रयत्न उधळला
यवतमाळ : एका मद्यपी पतीचा जाच असह्य झाल्याने संतापाच्याभरात पत्नीनेच कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना राळेगाव तालुक्यातील पार्डी येथे उघडकीस आली. घटनेनंतर त्याचा खून नसून अपघातात मृत्यू झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी तिचा हा प्रयत्न उधळला. तिला पोलिसांनी अटक केली आहे.
नानाजी मुनेश्वर (६०) रा. पार्डी असे मृताचे तर बेबीताई नानाजी मुनेश्वर (५५) असे मारेकरी पत्नीचे नाव आहे. नानाजी हा नेहमीच दारू पिऊन पत्नी बेबीताई हिला अश्लिल शिविगाळ करून मारहाण करायचा. दरम्यान गुरूवारी रात्री त्याने दारूच्या नशेत बेबीताईला शिविगाळ केली. तिने विरोध केल्यानंतर नानाजी चांगलाच संतप्त झाला. ही बाब असह्य झाल्याने बेबीताईने कुऱ्हाडीने घरातच त्याच्यावर हल्ला चढविला. त्यामध्ये डोक्यावर घाव वर्मी बसून नानाजी रक्ताच्या थारोळ््यात कोसळला. ही बाब लक्षात येताच त्याची मुले धावून आली. त्यांनी आईला शांत करून वडील नानाजी याला सावंगी मेघे येथे उपचारार्थ नेले. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता तेथे त्याचा मृत्यू झाला. यावेळी नानाजीचा खून नसून अपघातात गंभीर जखमी झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची गोपनीय माहिती वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांना मिळाली. त्यांनी पार्डी गाठून मारेकरी बेबीताई हिला शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने आपणच पती नानाजीचा खून केल्याची कबुली पोलिसांपुढे दिली. तिला अटक केल्याचे ठाणेदार माळवे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)