कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: August 12, 2014 00:10 IST2014-08-12T00:10:29+5:302014-08-12T00:10:29+5:30
कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, कृषी सेवा वर्ग दोन, कृषी सेवा वर्ग एक,

कृषी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
यवतमाळ : कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, कृषी सेवा वर्ग दोन, कृषी सेवा वर्ग एक, अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी संचालक या संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
राज्य शासनाने तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जा वाढविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. काही योजना जिल्हापरिषदेकडे हस्तांतरण रद्द करण्याची मागणी आहे. नैसर्गिककालिन परिस्थिती शेती पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाने संयुक्तरित्या काम करावे असे निर्धारित केले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, शून्य आधारित अर्थसंकल्पात कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीत नियमित करावे, कृषी पर्यवेक्षक संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावे, कृषी सेवकाची तीन वर्षाची सेवा अर्हता सेवा म्हणून ग्राह्य धरावी, कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्ती भत्ता लागू करावा, साप्ताहिक पेरणी अहवाल कृषी विभागाकडून काढून महसूल विभागाकडे सोपविण्यात यावा, ग्रामविकास विभागाकडून कृषी कर्मचाऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या कामास प्रतिबंध घालावा यासह अनेक मागण्यांसाठी कृषी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
यावेळी आर.डी. पिंपरखेडे, व्ही.बी. मिटकरी, प्रशांत गुडारे यांच्यासह विविध संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)