वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन व सत्कार सोहळा
By Admin | Updated: July 1, 2017 00:58 IST2017-07-01T00:58:34+5:302017-07-01T00:58:34+5:30
हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्यासोबतच सत्कार सोहळा

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषीदिन व सत्कार सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरी करण्यासोबतच सत्कार सोहळा येथील सहकार भवनात १ जुलै रोजी आयोजित केला आहे. सकाळी ७.३० वाजता वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला हारार्पण, वृक्षारोपण, गणवेश व साहित्य वाटप होणार आहे.
सहकार भवनात दुपारी ४ वाजता वसंतराव नाईक यांना अभिप्रेत असलेला कृषी विकास या विषयावर मार्गदर्शन होईल. जिल्हा परिषदेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी व अध्यक्षांचा सत्कार केला जाणार आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड अध्यक्षस्थानी राहतील. डॉ. टी.सी. राठोड, राजुदास जाधव, डॉ. वर्षा चव्हाण, भाऊराव राठोड, एल.एच. पवार, वसराम राठोड आदी उपस्थित राहतील. बंजारा टिचर्स असोसिएशन, आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, डॉक्टर्स सेवा असोसिएशन, अधिकारी, कर्मचारी युवा आघाडी, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आणि गोर बंजारा समाज बांधवांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख यशवंत राठोड यांनी कळविले.