जिल्हा परिषद सदस्य ‘डीपीसी’त आक्रमक

By Admin | Updated: August 3, 2014 00:18 IST2014-08-03T00:18:20+5:302014-08-03T00:18:20+5:30

जनसुविधेच्या कामातील फेरबदलाचा मुद्दा पुढे करत जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर कामात

The aggressor in the Zilla Parishad member DPC | जिल्हा परिषद सदस्य ‘डीपीसी’त आक्रमक

जिल्हा परिषद सदस्य ‘डीपीसी’त आक्रमक

कामात फेरबदल : अधिकाराची विचारणा, पालकमंत्र्यांवर शरसंधान
यवतमाळ : जनसुविधेच्या कामातील फेरबदलाचा मुद्दा पुढे करत जिल्हा परिषद सदस्यांनी शनिवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. प्रशासकीय मान्यतेनंतर मंजूर कामात फेरबदलाचा हा प्रश्न सदस्यांनी लावून धरला.
कामाच्या प्राधान्यक्रमावरून जिल्हा परिषद आणि नियोजन समिती यांच्यात सुरुवातीपासूनच कुरघोडी सुरू आहे. नेमका अधिकार कोणाचा हे अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही. हीच बाब पुन्हा एकदा डीपीसीत समोर आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामात फेरबदल झाल्याचे सभेत सांगितले. यामुळे ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता असताना तिथे पुन्हा शेड उभारण्यात आले. हा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
संगीता राजुरकर यांनी आमचा अधिकारी काय, ते नेमके स्पष्ट करा. सर्वच कामे पालकमंत्री ठरवत असतील तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना समितीत घेतलेच कशाला, असा प्रश्न त्यांनी मांडला. सभेतच त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला. यात विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी मध्यस्थी करून फेरबदल झालेल्या काही कामात अंशत: बदल करण्याचे सूचविले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The aggressor in the Zilla Parishad member DPC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.