सात दिवसानंतरही आरोपी मोकाटच

By Admin | Updated: September 28, 2015 02:47 IST2015-09-28T02:47:28+5:302015-09-28T02:47:28+5:30

येथील गोधणी मार्गावरील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुद्द क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षातच मद्यपींनी मैफिल भरवून त्यानंतर धुमाकुळ घातला.

After seven days, the accused Mokatch | सात दिवसानंतरही आरोपी मोकाटच

सात दिवसानंतरही आरोपी मोकाटच

क्रीडा कार्यालयात तोडफोड : वरिष्ठांकडूनच मिळत आहे अभय
यवतमाळ : येथील गोधणी मार्गावरील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुद्द क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षातच मद्यपींनी मैफिल भरवून त्यानंतर धुमाकुळ घातला. संगणकासह इतर साहित्याची तोडफोड केली व सीपीयु चोरून नेला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. सात दिवस उलटूनही यातील आरोपींना मात्र अटक करण्यात आली नाही.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मद्यप्राशन करून तोडफोड करणारे आरोपी शहरात राजरोसपणे फिरत आहेत. या घटनेनंतर डीएसओ कार्यालयाकडून वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी हॅन्डबॉल प्रशिक्षक गणेश शिरसाठ (४०) व संगणक चालक प्रफुल्ल किनकर (३७) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
उल्लेखनीय म्हणजे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात मद्यपान करून साहित्याची तोडफोड केल्यानंतर मद्यापींनी स्वत: भ्रमणध्वनीवरून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना घटनेची माहिती दिल्याचे समजते. क्रीडा अनुदानाच्या कमिशनच्या रकमेवरुन सदर घटना घडली असण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी ३ ते ५ यावेळी तीन ते चार मद्यपींनी क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षाचा ताबा घेतला आणि रविवारची पार्टी साजरी केली. नंतर नशेत क्रीडा अनुदानातून मिळणाऱ्या कमीशनवर एकमेकांच्या व वरिष्ठांच्या हिशांवर चर्चा सुरू झाली. यातून वाद निर्माण झाल्यावर एकाने रागारागात क्रीडा अनुदानाची गोपनीय माहिती साठवून ठेवलेला संगणक, प्रींटर व सीपीयूची तोडफोड करून इतरही साहित्याची नासधूस केली. या घटनेनंतर त्याच व्यक्तीने त्वेषाने जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना या घटनेबद्दल भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन आपण तोडफोड केल्याचेही सांगितले. तसेच यावर तुमचे काय म्हणणे आहे, असेही विचारल्याचे कळते. या सर्व गंभीर प्रकाराबाबत क्रीडा अधिकाऱ्यांनी कमालीची चुप्पी साधली आहे. शासनाच्या क्रीडा या महत्वाच्या कार्यालयात घडलेल्या या प्रकरणाकडे होत असलेले दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: After seven days, the accused Mokatch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.