एक तपानंतर मिळाला बहिणीला न्याय

By Admin | Updated: October 19, 2015 00:19 IST2015-10-19T00:19:16+5:302015-10-19T00:19:16+5:30

वडिलोपार्जित शेतीत हिस्सा मिळावा म्हणून बहीण-भावात असलेल्या वादात अखेर एक तपानंतर म्हणजेच १२ वर्षानंतर बहिणीला न्याय मिळाला.

After one stage, the sister got justice | एक तपानंतर मिळाला बहिणीला न्याय

एक तपानंतर मिळाला बहिणीला न्याय

पुसद : वडिलोपार्जित शेतीत हिस्सा मिळावा म्हणून बहीण-भावात असलेल्या वादात अखेर एक तपानंतर म्हणजेच १२ वर्षानंतर बहिणीला न्याय मिळाला. पुसदचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे. शर्मा यांनी साक्षी पुराव्यानंतर अपिलार्थीचे अपिल मंजूर केले.
पुसद तालुक्यातील निंबी पार्डी येथील विठ्ठल यादव वाघमारे यांची ११ हेक्टर ८५ आर शेतजमीन आहे. त्यात हिस्सा मिळावा म्हणून त्यांच्या मुली सुभद्राबाई देवकते व सिंधूताई नरहरी तोरडमल यांनी न्यायालयात दावा दाखल केला. यात भाऊ वाघांबर विठ्ठल वाघमारे व शंकर विठ्ठल वाघमारे यांच्याकडे असलेली ही वडिलोपार्जित जमिनीत सातवा हिस्सा मिळावा म्हणून दावा होता. न्यायालयात प्रकरण बारा वर्ष सुरू होते. या प्रकरणात अपिलार्थींची बाजू अ‍ॅड. बी.बी. जिल्हावार, अ‍ॅड. आशिष ेदेशमुख व अ‍ॅड. एन.एच. मुळे यांनी युक्तीवाद केला. पुसदचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.जे. शर्मा यांनी अपिलार्थींचे अपिल मंजूर केले. त्यामुळे एक तपानंतर बहिणीला न्याय मिळाला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: After one stage, the sister got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.