शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर जिल्ह्यात भरणार विनादप्तराची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांचा कोरोनापासून बचाव कसा करता येईल, याबाबत शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे, डॉ. सतपाल सोवळे यांनी सविस्तर आराखडा सभेत मांडला.

ठळक मुद्देशिक्षण समितीची सभा, विद्यार्थ्यांना दप्तर देण्यासाठी २० लाखांची तरतूद, २० लाख प्रोजेक्टरसाठी

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनानंतर शाळा सुरू होतील, तेव्हा होतील.. मात्र शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना कोणतेही साहित्य न घेता शाळेत येता यावे, यासाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करून दिले जाणार आहे.यंदाच्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेने शिक्षणासाठी दीड कोटींची तरतूद केलेली आहे. त्यातूनच आता २० लाख रुपये दप्तर खरेदीसाठी आणि २० लाख रुपये शाळेतील प्रोजेक्टर खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या सभेत या विषयावर सांगोपांग चर्चा झाली.कोरोनामुळे २०२०-२१ या सत्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत शासनस्तरावरून स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र शाळा २६ जूनला सुरू करता येईल का, याबाबत गावागावातील शाळा व्यवस्थापन समित्यांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यातच शाळा सुरू झाल्यास विद्यार्थी व शिक्षकांचा कोरोनापासून बचाव कसा करता येईल, याबाबत शिक्षण समितीचे सदस्य मधुकर काठोळे, डॉ. सतपाल सोवळे यांनी सविस्तर आराखडा सभेत मांडला.तर शिक्षक संघटनांच्या महासंघानेही सीईओंना निवेदन देऊन याबाबत विविध सूचना केल्या. त्यानुसार, शिक्षण समितीने दप्तर व प्रोजेक्टरचा विषय मार्गी लावला आहे.या तरतुदीनुसार, आता जिल्हा परिषद शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरून कोणतेही साहित्य आणण्याची गरज राहणार नाही. दप्तर, वह्या, पेन हे साहित्य सेस फंडातून दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तके समग्र शिक्षा अभियानातून मिळाणार आहे. या शिवाय, मागील वर्षीच्या पुस्तकांचा एक संचही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे एक पुस्तक घरी तर एक पुस्तक शाळेत राहील. त्यामुळे दप्तर किंवा पुस्तके घेऊन येण्याचीही गरज राहणार नाही, अशी माहिती मधुकर काठोळे यांनी दिली. शाळा सुरू करण्याचा आदेश आल्यास शिक्षक पूर्णपणे तयार असल्याची ग्वाही शिक्षण समितीच्या सभेत देण्यात आली. मात्र तत्पूर्वी गावखेड्यातील परिस्थितीचे सर्वेक्षण करण्याची मागणीही करण्यात आली.कोरोनाचे ‘ते’ दोन कोटी शाळेतच वापरा !यवतमाळ शहरातील कोरोनाच्या स्थितीत सील केलेल्या परिसरात तातडीने मदत पुरविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय झाला होता. मात्र मार्चऐवजी एप्रिलमध्ये ही कपात करण्यात आली. तोपर्यंत सील परिसरातील रुग्णसंख्या कमी होऊन त्या परिसरातील निर्बंधही हटविण्यात आले. त्यामुळे कपात झालेली दोन कोटींपेक्षा जास्त रक्कम तशीच पडून आहे. आता ही रक्कम शाळांवर खर्च करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या महासंघाने सीईओंकडे केली. या रकमेतून शाळेला विद्यार्थीसंख्येएवढे मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश, स्वच्छतागृह, वीजबिल आदींचा खर्च करण्याची मागणी आहे. मात्र या निधीचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे.आश्रमशाळा शिक्षकांना हजेरीचा आदेशशासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना २६ जूनपासून शाळेत हजर राहण्याचे आदेश धडकले आहे. मात्र शैक्षणिक सत्र सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय झालेला नाही. शिवाय जिल्ह्यात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी