शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:29 IST

जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते.

ठळक मुद्देप्रवेश फी भरली : मूळ उमरखेडचे पुण्यातील व्यावसायिक आले मदतीला धावून

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जीव तोड मेहनत करून सालगड्याने मुलाला शिकविले. मुलानेही अपार कष्ट करत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएसला नंबरही लागला. पण प्रवेश फी भरण्याची सोयच नसल्याने त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहणार होते. ‘लोकमत’ने ही कहाणी प्रकाशित करताच अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यातच मुळचे उमरखेडचे आणि आता पुण्यात यशस्वी व्यावसायिक असलेले विवेक मामीडवार यांनी या मुलाच्या संपूर्ण शिक्षणासह राहण्या-जेवणाचा खर्चही स्वत: करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अखेर सालगड्याचा मुलगा डॉक्टर होणारच आहे.बंदीभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम जेवली गावातील गुलाब पडवाळे यांचा मुलगा अरविंद याने ‘नीट’मध्ये ३९३ गुण मिळवले. त्याचा ‘एमबीबीएस’साठी मुंबई येथील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजला नंबरही लागला. परंतु, प्रवेश शुल्कासह निवासासाठी पैशाची व्यवस्थाच नव्हती. आई शेतमजुरी करणारी व वडील सालगाडी म्हणून राबणारे. त्यामुळे ‘सालगड्याच्या मुलाचा एमबीबीएस प्रवेश अडला’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने ९ जुलै रोजी प्रकाशित केले.त्याची दखल विडूळ येथील आदर्श शिक्षक स्व. शंकरराव मामीडवार आणि शिक्षिका नंदाताई मामीडवार यांच्या मुलाने घेतली. विवेक मामीडवार त्यांचे नाव. अरविंद गुलाब पडवाळे या मुलाच्या एमबीबीएसच्या ५ वर्षांची पूर्ण फी, पुस्तके, इतर साहित्य तसेच मुंबत राहणे, जेवण यासह शिक्षण होईपर्यंत लागणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी विवेक मामीडवार यांनी स्वीकारली. यातूनच १२ जुलै रोजी अरविंदची फी भरून त्याचा एमबीबीएस प्रवेशही निश्चित करण्यात आला.‘लोकमत’चे मानले आभारअरविंद पडवाळेची बातमी ‘लोकमत’मधून प्रकाशित होताच अनेकांनी दखल घेतली. त्यात विवेक मामीडवार यांनी साडेपाच वर्षांचा अंदाजे १० लाखांपर्यंतचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. याचे सर्व श्रेय ‘लोकमत’लाच असल्याची भावना अरविंदचे वडील गुलाब तलुसिंग पडवाळे यांनी व्यक्त केली. काबाडकष्ट करून शिकविलेला आपला मुला आता डॉक्टर होणार, या कल्पनेने आई पतियाबाई आणि वडील गुलाब पडवाळे यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या होत्या.बिल्डरने जन्मभूमीशी जपले नातेविवेक मामीडवार पुण्यात बिल्डर म्हणून व्यवसाय करतात. मामीडवार परिवार उमरखेड तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमात सढळ हाताने मदत करते. आई वडिलांच्या संस्कारातूनच हे काम सुरू असल्याचे विवेक मामीडवार म्हणाले. वडील शंकरराव मामीडवार यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आई नंदाताई मामीडवार यांच्या मार्गदर्शनात तीन भाऊ समाजाशी नाळ जुळवून आहेत. डॉ. सचिन मामीडवार हे उमरखेडला, विवेक मामीडवार पुण्यात, तर राजेश मामीडवार अमेरिकेत असतात. परंतु, उमरखेड तालुक्यातील जेवलीच्या मुलासाठी मदत पाठवून त्यांनी आपल्या जन्मभूमीशी नाते कायम राखले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयeducationशैक्षणिक