शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी मोबदल्यासाठी वकिलाची फी एक कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:31 IST

प्रकल्पग्रस्तांसाठी कायद्याची लढाई लढणाऱ्या एका वकिलाने शेतकऱ्यांच्या दोन कोटींच्या मोबदल्यातील अर्ध्या रकमेवर (सुमारे एक कोटी) आपल्या वकील फीची मोहर उमटविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील प्रकल्प : शेतकºयांची मात्र नाराजी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : प्रकल्पग्रस्तांसाठी कायद्याची लढाई लढणाऱ्या एका वकिलाने शेतकऱ्यांच्या दोन कोटींच्या मोबदल्यातील अर्ध्या रकमेवर (सुमारे एक कोटी) आपल्या वकील फीची मोहर उमटविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष असे या वकील फीतील अर्धी रक्कम सदर वकिलाने एका अर्बन बँकेत रोख स्वरूपात भरल्याचेही स्पष्ट झाले आहे.दारव्हा तालुक्यात एक मोठा प्रकल्प आहे. यातील प्रकल्पग्रस्तांना त्यावेळी शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळाला होता. मात्र त्यावर समाधान न झाल्याने या ३०-३२ शेतकºयांनी वाढीव मोबदल्यासाठी प्रकरण दाखल केले. भूसंपादन कायद्यातील कलम २८ मधील तरतुदीनुसार स्टॅम्प ड्युटीशिवाय मोबदल्यासाठी प्रकरण दाखल करता येते. त्याचाच आडोसा घेऊन एका वकिलाने या प्रकल्पग्रस्तांची कायद्याची लढाई लढण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी या प्रक्रियेसाठी आता एक पैसाही घेणार नाही, मात्र मोबदला मिळाल्यानंतर ४० टक्के रक्कम फी म्हणून द्यावी, असा मौखिक करार वकील व प्रकल्पग्रस्तांमध्ये झाला. ठरल्याप्रमाणे काही वर्षे हे प्रकरण चालले. अखेर दिवाणी न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय देताना त्यांना वाढीव मोबदला मंजूर केला. ३२ प्रकल्पग्रस्तांना सुमारे दोन कोटी रुपये वाढीव मोबदला मंजूर झाला. भूसंपादन विभागाने दोन कोटींची ही रक्कम स्टेट बँकेत जमा केली. मात्र शेतकºयांनी आपले पुढील व्यवहार एका अर्बन बँकेत केले. इकडे वकिलाने आपली फी ४० टक्क्यावरून थेट ५० टक्के केली. त्यापोटी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून ठरलेल्या रकमेचे बेरर चेक घेतले गेले. हे चेक वटविण्याबाबत एका अर्बन बँकेशीही वकिलाचे बोलणे झाले होते. त्यानुसार त्या सर्व चेकची सुमारे एक कोटींची रक्कम त्या वकिलाला दिली गेली, असे सांगितले जाते. मात्र बँकेने ही रक्कम देण्यासाठी आमच्या बँकेतच किमान अर्धी रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवा, अशी अट घातली. त्यानुसार ही रक्कम बँकेत ठेवली गेल्याची माहिती आहे. वकिलाने फी म्हणून शेतकऱ्यांकडून तब्बल एक कोटी रुपये घेतल्याच्या या प्रकरणाची विधीक्षेत्रात चांगलीच चर्चा आहे. घर-जमिनी गेलेल्या गोरगरीब शेतकºयांकडून घेतल्या गेलेली एक कोटींची ही रक्कम पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. अपघात विमा दाव्यांमध्येसुद्धा अशाच पद्धतीने नुकसानभरपाई रकमेच्या (क्लेम) अर्ध्याला अर्धी रक्कम फी म्हणून घेतली जात असल्याचे सांगितले जाते.५२ लाखांची रोकड अर्बन बँकेतया प्रकरणी सदर अर्बन बँकेकडे चौकशी केली असता त्या वकिलाने तब्बल ५२ लाख रुपये रोख स्वरूपात बँकेत भरले, आजच्या घडीला त्याच्या खात्यात पाच लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणात बँकेने जाणीवपूर्वक काही केल्याचीबाब स्पष्टपणे नाकारण्यात आली आहे. खातेदाराने कितीही रक्कम दिली तरी ती बँकेला स्वीकारावीच लागते, जुने बँक खाते असेल तर त्याला पॅनकार्ड नंबर तेवढा आवर्जुन मागितला जातो, असे बँकेच्यावतीने ‘लोकमत’कडे स्पष्ट करण्यात आले.वकील म्हणतात, पाच वर्षे लढा, ३१ लाख खर्चदरम्यान, सदर वकिलाशी आमच्या वार्ताहराने संपर्क केला असता एक कोटींच्या या फीचे वकिलाने जोरदार समर्थन केले. गेल्या पाच वर्षांपासून आपण एक पैसाही न घेता प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा कायद्याचा लढा लढत आहोत, त्यात आपले ३१ लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले. त्यामुळे ठरल्यानुसार एक कोटींची फी घेण्यात गैर काय असा प्रतिप्रश्न या वकिलाने केला. या रकमेपोटी आपण रितसर कर शासनाला भरणार असून जीएसटी क्रमांक मिळविण्यासाठी अर्ज केल्याचेही सदर वकिलाने ‘लोकमत’ला सांगितले.