पांढरकवडा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींवर प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:28 IST2021-07-20T04:28:32+5:302021-07-20T04:28:32+5:30
तालुक्यातील मुंझाळा, कोठोडा, अकोली बु. असोली, भाडउमरी, बोथ, दाभा मानकर, धारणा, घोडदरा, करंजी रोड, कारेगाव बंडल, केगाव, खैरगाव बु., ...

पांढरकवडा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींवर प्रशासक
तालुक्यातील मुंझाळा, कोठोडा, अकोली बु. असोली, भाडउमरी, बोथ, दाभा मानकर, धारणा, घोडदरा, करंजी रोड, कारेगाव बंडल, केगाव, खैरगाव बु., खैरगाव देशमुख, मंगी, मारेगाव मो., मराठवाकडी, मीरा, मोहदा, सुसरी, वाघोली, झुली, डोंगरगाव या ग्रामपंचायतींची मुदत १३ जुलै रोजी संपली आहे. मागील वर्षी कोरोना काळातच तालुक्यातील दोन टप्प्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यावर्षी मात्र मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने सध्या तरी या निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य यांच्यावतीने करण्यात येत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्यावतीने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याकरिता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.