६१ गावांचा कारभार ६८ पोलिसांवर

By Admin | Updated: June 15, 2015 02:38 IST2015-06-15T02:38:09+5:302015-06-15T02:38:09+5:30

संवेदनशील दिग्रस शहरासह तालुक्यातील ६१ गावांचा कारभार केवळ ६८ पोलिसांना सांभाळावा लागत आहे.

The administration of 61 villages on 68 policemen | ६१ गावांचा कारभार ६८ पोलिसांवर

६१ गावांचा कारभार ६८ पोलिसांवर

दिग्रस : संवेदनशील दिग्रस शहरासह तालुक्यातील ६१ गावांचा कारभार केवळ ६८ पोलिसांना सांभाळावा लागत आहे. दररोज घडणाऱ्या घटनांचा तपास आणि कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.
दिग्रस पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक, आठ जमादार, पाच सहायक पोलीस, २३ पोलीस नायक, २७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यात १०४ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना सध्या ६८ पोलिसांवर कारभार पहावा लागतो. दिग्रस शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. तसेच ६१ गावांचा कारभार पोलिसांना पहावा लागतो. पोलीस ठाण्याचा विस्तार आठ बीटमध्ये असून दिग्रस शहराला एक बीट व तालुक्यात सात बीट आहेत. प्रत्येक बीटला एक जमादार आणि एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशा प्रकारे आठ बीटमध्ये १६ कर्मचारी कार्यरत आहेत. वाहतूक व्यवस्थेसाठी चार कर्मचारी, गुन्हे विभागात तीन, वायरलेसमध्ये दोन, चालक म्हणून एक कर्मचार कार्यरत आहे.
शहर व शहराबाहेर गस्त, नाकाबंदीसाठी दहा कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यात साप्ताहिक सुट्याही असतात. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करण्यास पोलिसांना वेळच मिळत नाही. दैनंदिन कामकाज सांभाळताना पोलिसांची दमछाक होताना दिसते. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The administration of 61 villages on 68 policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.