आमदारांच्या घरासमोर आदिवासींचे धरणे

By Admin | Updated: June 26, 2016 02:21 IST2016-06-26T02:20:06+5:302016-06-26T02:21:51+5:30

आदिवासी जमातीच्या सुचिमध्ये धनगरांचा समावेश करण्याची पावले शासनाकडून उचलली जात आहे.

Adivasis dam in front of MLA's house | आमदारांच्या घरासमोर आदिवासींचे धरणे

आमदारांच्या घरासमोर आदिवासींचे धरणे

अनुसूचित जमातीत धनगरांचा समावेश : खऱ्या आदिवासींवर अन्याय होण्याची शक्यता
पांढरकवडा : आदिवासी जमातीच्या सुचिमध्ये धनगरांचा समावेश करण्याची पावले शासनाकडून उचलली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजता आदिवासी अन्याय निवारण संघर्ष समितीतर्फे आमदार राजू तोडसाम यांचे घरावर मोर्चा नेऊन धरणे आंदोलन केले.
आदिवासींच्या आरक्षण हक्कासंबंधी कोणताही निर्णय घेण्याविषयी मार्गदर्शन करणारी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण समिती ही संस्था आहे. मात्र या समितीला डावलून खासगी टाटा संस्थेकडून धनगर जातीचा सर्व्हे करून आदिवासींच्या सूचीत धनगर जातीला टाकण्याचा घाट सुरू आहे. येथील बसस्थानकाजवळील वीर बाबूराव शेडमाके चौकातून सुरूवातीला निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात भाऊराव मरापे, वामन सिडाम, रितेश परचाके, बबन सोयाम, विलास आत्राम, प्रशांत सोयाम, किशोर कनाके, बाबुलाल मेश्राम, भाऊ कुमरे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा बसवेश्वर चौक, तहसील चौक व तेथून परत बिरसा मुंडा चौकमार्गे आ.राजू तोडसाम यांच्या घराजवळ पोहोचला. तेथे मुख्यमंत्री फडणवीस, ना.पंकजा मुडे व भाजप सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रशांत सोयाम, रितेश परचाके, भाऊराव मरापे, बबन सोयाम आदींनी आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले. धनगर जातीचा या संस्थेकडून सर्व्हे करून आदिवासीच्या सूचीत टाकण्याचा कुटील डाव फडणवीस सरकारने घातला आहे. हा कुटील डाव हानून पाडण्याकरिता व आदिवासींचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आमदारांच्या घरासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे रितेश परचाके यांनी सांगितले. शासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा भाऊराव मरापे यांनी दिला. त्यानंतर अ.राजू तोडसाम यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आपण सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार असलो, तरी आदिवासी बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही, सभागृहात हा प्रश्न उपस्थित करून शासनाला जाब विचारू, असे आश्वासन आमदार तोडसाम यांनी आंदोलनकर्त्या आदिवासींना दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Adivasis dam in front of MLA's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.