रेल्वेकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 06:00 AM2019-12-13T06:00:00+5:302019-12-13T06:00:07+5:30

वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आहे. ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने ५४७ कोटी रुपये जिल्ह्याकडे वळते केले.

Additional proposal for 90 hectares of land for railway | रेल्वेकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव

रेल्वेकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव

Next
ठळक मुद्दे१,१४४ हेक्टरचे भूसंपादन पूर्ण : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावरील भूसंपादन अंतिम टप्प्यात पोहचले आहे. ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संयुक्त मोजणीचे कामकाज पूर्णत्वास आले आहे. आतापर्यंत १,१४४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यात ९५ गावांची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आहे. ही जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याकरिता रेल्वे प्रशासनाने ५४७ कोटी रुपये जिल्ह्याकडे वळते केले. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होताच हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे.
यानंतरही काही प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याकरिता ९० हेक्टर जमिनीचा अतिरिक्त प्रस्ताव भूसंपादन विभागाकडे आला आहे. यामध्ये यवतमाळ आणि कळंब तालुक्यातील प्रस्तावांचा समावेश आहे. कळंबचे मोजमाप सुरू आहे. यवतमाळातील काही मोजमाप आटोपले आहे. येत्या काही दिवसात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा भूसंपादन विभाग करणार आहे.

Web Title: Additional proposal for 90 hectares of land for railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे