बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी सक्रिय

By Admin | Updated: December 19, 2015 02:29 IST2015-12-19T02:29:37+5:302015-12-19T02:29:37+5:30

रेशन परवानाधारकांकडून कार्डधारकांना धान्यासाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे. शिवाय शासकीय कार्यालयात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

Activate gang making fake Aadhar cards | बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी सक्रिय

बनावट आधार कार्ड बनविणारी टोळी सक्रिय

पैसेही उकळल्याच्या तक्रारी : दुसऱ्याच दिवशी कार्ड देण्याची दिली जाते हमी
मांगलादेवी : रेशन परवानाधारकांकडून कार्डधारकांना धान्यासाठी आधार कार्डची मागणी केली जात आहे. शिवाय शासकीय कार्यालयात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत अज्ञानी आणि गरिबांना बोगस आधार कार्ड बनवून देणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे पुढे येत आहे.
या टोळीतील लोक गावातील अशिक्षित व गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांना केवळ एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मतदान कार्ड मागितले जाते. कार्ड बनविण्यासाठी २०० रुपयांची मागणी केली जाते. ठरल्याप्रमाणे व्यवहार झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आधार कार्ड त्यांना उपलब्ध करून देतात. ना हाताचे ठसे, ना डोळ्याचा फोटो किंवा लाईनमध्ये उभे राहण्याचा त्रास नाही. त्यामुळे लोकांनीसुद्धा या टोळीकडून आधार कार्ड प्राप्त करून घेतले.
या आधार कार्डविषयीची सत्यता वेबसाईटवर पडताळून पाहिली असता ‘नॉट ए व्हॅलिड आधार’ असा संदेश येतो. त्यामुळे परिसरातील काही लोकांनी संबंधितांकडून काढलेले आधार बनावट असल्याचे सिद्ध होते. तालुक्यात केवळ नेर येथे एक आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू आहे. यासंदर्भात या केंद्राचे श्रेणीक सिंघवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आधार कार्ड नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती गरजेचे असल्याचे सांगितले. शिवाय एखाद्याला हाताचे बोट नसेल तर त्याचेही आधार कार्ड निघत नसल्याचे ते म्हणाले. यावरून परिसरात बनावट आधार कार्ड तयार करून देणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. अशा प्रकारे आधार कार्ड बनवून देणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Activate gang making fake Aadhar cards