शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

विनापरवानगी फटाके विकणाऱ्यांवर होणार कारवाई; परवानगी घेणे बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:19 IST

आतापर्यंत ३५ जणांना परवाने : वणीत दुकाने लागतात १०० च्यावर

जब्बार चीनी लोकमत न्यूज नेटवर्क वणी: दिवाळी उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात फटाक्यांची दुकाने थाटली जात आहेत. मात्र दुकान मालकांकडे परवाना नसेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येते. कुठल्याही व्यावसायिक दुकानदारांनी प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी रीतसर परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक आहे. तहसीलने सोमवारपर्यंत ३५ जणांना विक्रीचे परवाने दिल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र, दिवाळीत शहरभरात शंभरहून अधिक दुकानातून बेकायदा फटाका विक्री सुरू असल्याचे दिसून येते. या अनधिकृत दुकाने व बेकायदा विक्रीवर कारवाई करण्याकडे तहसील प्रशासन व पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप आहे.

फटाके विक्रीसाठी परवानगी आवश्यक फटाके हे ज्वलनशील असल्याने फटाक्यांची विक्री करण्याकरिता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची देखील परवानगी घेणे गरजेचे असते. पोलिस प्रशासन, नगरपालिका, अग्निशमन विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर बाजारात फटाक्यांची दुकाने सुरू करता येते.

अर्ज कोठे कराल? ज्या भागात फटाक्यांचे दुकान लावायचे आहे. त्याठिकाणी उपविभागीय अधिकारी किंवा नगरपालिकेकडे रीतसर अर्ज करावा लागतो. अर्जाची छाननी झाल्यानंतर संबंधित विभागाकडून तात्पुरता परवाना दिला जातो. 

कागदपत्रे काय लागणार ? स्फोटके बाळगण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी परवाना मंजुरी नोटरी केलेला अर्ज, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलिस विभागाचे स्थळ निरीक्षण अहवाल, पालिकेची एनओसी, जागा मालकांचे भाडेपत्र, पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे हमीपत्र इत्यादी.

रीतसर परवाना काढावा अनेकजण कशाला परवानी घ्यावी आठवडाभर तर दुकान लावायचे आहे. असे म्हणनू कुठल्याही परवानगीशिवाय बाजारात फटाक्यांची दुकाने थाटतात. मात्र, महापालिका किंवा पोलिस प्रशासनाच्या तपासणीत परवाना नसल्याने उघड झाल्यास त्यांच्यावर पालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

"फटाक्यांचे दुकान लावणाऱ्या प्रत्येक दुकान मालकाकडे फटाके विक्रीचा परवाना असणे बंधनकारक आहे. विनापरवाना फटाके विक्री करताना एखादी व्यक्ती आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे विनापरवाना कुणीही फटाके विक्री करू नये." - निखिल धुळधर, तहसीलदार, वणी.

टॅग्स :fire crackerफटाकेYavatmalयवतमाळDiwaliदिवाळी 2023