वॉर्डात फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:00:12+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने नगरपरिषदेने शहरातील १५१ भाजीपाला व फळांच्या दुकानांची स्थान निश्चिती केली. आता उन्हाच्या तडाख्यामुळे या सर्व तिन्ही ठिकाणी मंडप उभारला. संचारबंदीमुळे केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी आहे. यात नेमून दिलेल्या ठिकाणीच नागरिकांना भाजीपाला व फळे मिळणार आहे.

Action on ward walkers | वॉर्डात फिरणाऱ्यांवर कारवाई

वॉर्डात फिरणाऱ्यांवर कारवाई

ठळक मुद्देपुसद पालिकेचा निर्णय : शहरात केवळ तीन ठिकाणीच मिळेल भाजीपाला

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : नगरपरिषदेने फळ व भाजी विक्रेत्यांना निश्चित जागा नेमून दिली. या जागेशिवाय वॉर्डात फिरणाºया फळ व भाजी विक्रेत्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात तीनच ठिकाणी भाजीपाला व फळ खरेदी करता येणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, या उद्देशाने नगरपरिषदेने शहरातील १५१ भाजीपाला व फळांच्या दुकानांची स्थान निश्चिती केली. आता उन्हाच्या तडाख्यामुळे या सर्व तिन्ही ठिकाणी मंडप उभारला. संचारबंदीमुळे केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी आहे. यात नेमून दिलेल्या ठिकाणीच नागरिकांना भाजीपाला व फळे मिळणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेचे बंधन आहे. यापुढे अवैधपणे वॉर्डात फिरणाºया दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. चोख व्यवस्थापनासाठी तीन नियंत्रण अधिकाऱ्यांसह १२ कर्मचाºयांची तीन पथके तैनात करण्यात आली आहे.
कारला रोडवरील जिनिंग क्रमांक २, वाशिम रोडवरील शिवाजी विद्यालयाचे प्रांगण व यशवंत स्टेडीयमवर एकूण १५१ भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या. मुख्याधिकारी निर्मला राशिनकर-यमगर यांच्या पुढाकाराने जिनिंग क्रमांक-२ मध्ये ८५ फळे व भाजीपाला विके्रत्यांना गुलाबी रंगाची पास दिली. नियंत्रण अधिकारी अविनाश अर्धापूरकर यांच्या मार्गदर्शनात चार कर्मचाºयांचे पथक तैनात करण्यात आले. यशवंत स्टेडीयमवर ४८ फळे व भाजीपाला विक्रेत्यांना पिवळ््या रंगांच्या पास दिला. नियंत्रण अधिकारी धर्मेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात, तर शिवाजी विद्यालयात १८ फळे व भाजीपाला विक्रेत्यांना निळ््या रंगांच्या पास देऊन नियंत्रण अधिकारी म्हणून प्रशांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले.

गर्दी टाळण्यासाठी केली उपाययोजना
पालिकेने गर्दी टाळण्यासाठी फळे व भाजीपाला विके्रत्यांसाठी पिवळ््या, निळ््या व गुलाबी रंगांच्या पासेस दिल्या. त्यांची स्थान निश्चिती केली. तरीही काही भाजी विक्रेते हातगाडी, सायकल, मोटारसायकल आदींमार्फत वॉर्डात फिरून भाजीपाला व फळांची विक्री करीत असल्याची माहिती आहे. त्यांची वाहने जप्त करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दिला आहे.

Web Title: Action on ward walkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.