उमरखेड शहरात दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 20, 2015 01:54 IST2015-03-20T01:54:26+5:302015-03-20T01:54:26+5:30
शहरात दोन गटांत जुन्या वैमनस्यातून बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले ...

उमरखेड शहरात दोन गटांत हाणामारी
उमरखेड : शहरात दोन गटांत जुन्या वैमनस्यातून बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले.
शहरातील गुजरी वॉर्डात सायंकाळच्या सुमारास एका पान टपरीवर दोन-तीन जण उभे असताना जुन्या वैमनस्यातून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यामध्ये पाच जण गंभीर तर इतर किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींमध्ये शेख तालिब, सैयद सईद, शेख मतीन शेख हमीद, रहीस खान अय्याज खान व अय्याज खान यांचा समावेश आहे. जखमींना प्रथम उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात व नंतर नांदेड येथे हलविण्यात आले. या प्रकरणी रहीस अहमद यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख तालिब शेख सैयद, शेख मतीन, शेख वसिम, शेख बाबर, शेख जाफर सर्व रा.उमरखेड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दुसऱ्या गटातील शेख तालिब शेख मुक्तार यांनी दिलेल्या तक्रारीवरून उबेद खान, परवेज खान, वहजाब खान, रहीस खान, मुन्ना खान यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)