बसपाच्या तीन नगरसेवकांवर कारवाई

By Admin | Updated: November 22, 2014 01:58 IST2014-11-22T01:58:00+5:302014-11-22T01:58:00+5:30

विधानसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या तीन नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई करत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते.

Action on three BSP corporators | बसपाच्या तीन नगरसेवकांवर कारवाई

बसपाच्या तीन नगरसेवकांवर कारवाई

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या तीन नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई करत काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिले होते. याची बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी दखल घेतली असून, या तीनही नगरसेवकांना पक्षातून सहा वर्षासाठी निष्कासित करण्यात आले आहे.
यवतमाळ विधानसभेत बसपाने आपला अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला होता. त्यानंतरही बसपाच्या नगरसेकांनी विरोधी भुमिका घेऊन ऐन वेळेवर काँग्रेस उमेदवारासोबत हातमिळवणी केली. शहरात बसपाचे एकुण चार नगरसेवक असून, निवडणूक काळात केवळ ज्योती खोब्रागडे यांनी पक्षाचे काम केले. इतर नगरसेवक वेळेवरच विरोधी गटात जाऊन बसले. या त्यांच्या कृतीची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. हरीष पिल्लारे, पंकज मेश्राम, ज्योती आडे या तिघांनाही पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे बहुजन समाज पार्टीतून सहा वर्षासाठी निष्कासित करीत असल्याचा आदेश प्रदेश उपाध्यांनी दिला आहे. शिवाय या तिन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असा प्रस्तावही पक्षाकडून लवकरच दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईमुळे नगरपरिषद वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
नगरपरिषदेत सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकुण पालिकेत सदस्यत्व मिळविलेल्या अनेक नगरसेवकांनी सोयीनुसार भुमिका बदलली आहे. नगरपालिकेतील राजकारणात पक्षांना कुठलेचे स्थान नाही. हे अनेकवेळा झालेल्या घडामोडींवरून सिद्ध झाले आहे. केवळ गटातटाशी जुळवून घेत नगरसेवकांची वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. कुणीही काही नगरसेवकांबाबत ते नेमके कोणत्या पक्षाचे आहे हे सांगूच शकत नाही. यामध्ये सत्ताधारी, विरोधक आणि नव्यानेच पालिकेत आलेल्या नगरसेवकांचाही समावेश आहे. ज्येष्ठ सदस्यही सातत्याने येथे भुमिका बदलविताना दिसतात. त्यामगे कोणता आधार आहे, याचे उत्तर मात्र अजूनही कुणालाच मिळालेले नाही. अशाच स्थितीत पक्षाकडून नगरसेवकांकडून कारवाई करणे ही बाब नवीन राहिलेली नाही.
सर्वातप्रथम काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर निष्कासनाची कारवाई केली. त्यानंतर येथील शहर विकास आघाडीने व्हीप झुगारला म्हणून माजी नगराध्यक्षासह सात नगरसेवकांवर अपात्रतेचा खटला दाखल केला. आता बसपाकडून तोच कित्ता गिरविण्यात आला आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Action on three BSP corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.