बनावट राशन कार्ड आढल्यास कारवाई

By Admin | Updated: August 15, 2015 02:36 IST2015-08-15T02:36:50+5:302015-08-15T02:36:50+5:30

बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.

Action taken on fake ration card | बनावट राशन कार्ड आढल्यास कारवाई

बनावट राशन कार्ड आढल्यास कारवाई

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरवठा विभागाचा आढावा, नियमित तपासणीचे अधिकाऱ्यांना निर्देश
यवतमाळ : बनावट राशन कार्ड आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. लाखो राशनकार्ड धारकांना प्रत्येक महिन्यात स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या पुरवठा व्यवस्थेत शासकीय यंत्रणेसोबतच रास्तभाव दुकानादारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे दुकानदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता वाटपाची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
पुरवठा विभागाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची गार्डन हॉल येथे बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुरवठ्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी गावकऱ्यांना मोबाईल एसएमएससह दक्षता समित्याच्या सदस्यांसमोरच धान्याची उचल व वाटप करण्याचे निर्देश पुन्हा त्यांनी बैठकीत दिले. पात्र नसताना ठिकठिकाणी अनेकांचा अन्नधान्य लाभाच्या यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. रास्तभाव दुकानदारांनी पुढाकार घेऊन अशा व्यक्तींची नावे निदर्शनास आणून दिली पाहिजे. या व्यक्ती यादीतून वगळल्यास अन्य गरजू व्यक्तींना अन्नधान्याचा लाभ दिला जाऊ शकतो, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. काही व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा दबाव असल्यास तसेही सांगावे. त्यानंतर मात्र पुरवठ्यात गैरप्रकार आढळल्यास क्षमा केली जाणार नाही. प्रत्येक वाटपाच्या किाणी वाटपासंदर्भात चार्ट लावण्यात यावा. नागरिकांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती या चार्टमध्ये नमुद करावी, त्यामुळे वाटपात पारदर्शकता येईल.
पुरवठा विभागाच्या कामात तसेच वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी रास्तभाव दुकानांची दर्जात्मक निरिक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या निरिक्षणामुळे पुरवठ्यातील त्रृट्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. काही वेळा बोगस राशनकार्डव्दारे धान्याचे उचल होण्याची शक्यता असते. काही ठिकाणी दुकानदारांचाही यात सहभाग असू शकतो, असे बोगस राशनकार्ड आढळल्यास संबंधित दुकान रद्द करण्यासोबतच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गंत फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्या जाती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राशनकार्डसाठी नागरिकांचे अर्ज असल्यास ते तातडीने निकाली काढा, अर्ज प्रलंबित राहू देऊ नका. लाभार्थ्यांचे राशनकार्ड त्यांच्याकडे असावे, काही ठिकाणी दुकानदारांकडे राशनकार्ड असल्याचा तक्रारी होत असतात. जिल्ह्यात असे होता काम नये, असे सांगून तालुकानिहाय कर्मचाऱ्यांच्या अडचणीही यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी समजून घेतल्या व सबंधितांना सूचना दिल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Action taken on fake ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.