अप्सरा टॉकीज चौकात दोन कुटुंबांत हाणामारी
By Admin | Updated: September 4, 2015 02:22 IST2015-09-04T02:22:44+5:302015-09-04T02:22:44+5:30
मुलीच्या लग्नावरून दोन कुटुंबात वाद होऊन तुफान मारहारी झाल्याची घटना येथील अप्सरा टॉकीज परिसरात बुधवारी दुपारी घडली.

अप्सरा टॉकीज चौकात दोन कुटुंबांत हाणामारी
१३ जणांवर गुन्हा : लग्नावरून उफाळला वाद
यवतमाळ : मुलीच्या लग्नावरून दोन कुटुंबात वाद होऊन तुफान मारहारी झाल्याची घटना येथील अप्सरा टॉकीज परिसरात बुधवारी दुपारी घडली. परस्परा विरोधी तक्रारीवरून शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली.
अप्सरा टॉकीज चौक परिसरात झालेल्या लग्नावरून हा वाद निर्माण झाला. या प्रकरणी माधुरी सावंत वाड रा. बांगरनगर यांच्या तक्रारीवरून अर्पणा गेडाम, अनिल गेडाम, कुणाल गेडाम, बबीता गेडाम, दीपा गेडाम, सुवर्णा गेडाम, नेहा गेडाम, गौरव गेडाम, अक्षय गेडाम सर्व रा. अप्सरा टॉकीज परिसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर याच प्रकरणात नेहा विजयराव गेडाम हिच्या तक्रारीवरून नितीन जगदेवराव उमक, सावन डेव्हीड वाड, माधुरी वाड, दीपा उमक यांच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. परस्पराविरोधात तक्रार दाखल करण्यास आलेल्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. गुरवारी दुपारी दोन्ही कुटुंबातील सदस्य न्यायालयात जामीनासाठी धडपड करत होते. (कार्यालय प्रतिनिधी)