संधीसाठी कौशल्य आत्मसात करा

By Admin | Updated: July 18, 2015 02:23 IST2015-07-18T02:23:04+5:302015-07-18T02:23:04+5:30

विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, परंतु केवळ कुशलतेचा अभाव असल्याने या संधीचा उपयोग घेता येत नाही.

Acquire the skill for opportunity | संधीसाठी कौशल्य आत्मसात करा

संधीसाठी कौशल्य आत्मसात करा

सचिंद्र प्रताप सिंह : जागतिक युवा कौशल्यदिन साजरा
यवतमाळ : विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे, परंतु केवळ कुशलतेचा अभाव असल्याने या संधीचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कौशल्यपूर्वक ज्ञान आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, व्यवसास शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एस. व्ही. राठोड, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगारच्या सहायक संचालक प्रांजली मशीदकर उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मदतीची आवश्यकता असते. त्यासाठी आवश्यक ते शुल्क द्यावयास संबंधित व्यक्ती तयार असतात. सर्वसामान्यांची गरज लक्षात घेता तशी सेवा पुरविणारे उद्योग सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या पद्धतीचे कौशल्य आत्मसात केल्यास प्रत्येकास स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. कलशेट्टी यांचेही भाषण झाले.
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम राबविल्याबद्दल अमोल इंडस्ट्रिजचे पांडुरंग खांदवे, रेमंडचे जनरल मॅनेजर श्रीवास्तव, हिमालय कार सेंटरचे किशोर गोपलानी यांना स्मृतीचिन्ह व वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच रेमंड व औरंगाबाद येथील प्रेस कॉम्पोनंट या कंपनीत नियुक्ती देण्यात आलेल्या युवकांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले. त्यात आशीष पाल, बंडू राठोड, गणेश मेंडके, स्वप्नील पिंपळे, आकाश देशकरी, विशाल करमणकर, धनंजय शिरसागर, भूषण ढोबळे, सागर मोहोड या युवकांचा समावेश आहे.

Web Title: Acquire the skill for opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.