घाटंजी येथे आचार्य अभ्यासवर्ग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST2021-03-01T04:49:41+5:302021-03-01T04:49:41+5:30

शिबिर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर निस्ताने होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर अवचित, संजय गुंडे, श्रीकांत ...

Acharya Study Camp at Ghatanji | घाटंजी येथे आचार्य अभ्यासवर्ग शिबिर

घाटंजी येथे आचार्य अभ्यासवर्ग शिबिर

शिबिर समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर निस्ताने होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर अवचित, संजय गुंडे, श्रीकांत गजभिये, अतुल नेवारे, मनोज बोबडे, शिवाजी राऊत, सुरेश राठोड, विकास राठोड, राजू ठाकरे, राजू राठोड उपस्थित होते. मोहन पवार यांनी प्रास्तविकामध्ये एकल विद्यालय अभ्यासवर्ग शिबिराच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थिंना पंचमुखी विद्या, प्रोत्साहन, जनजागृती, संस्कार शिक्षा, आरोग्यसेवा, ग्रामविकास शिक्षा, वृत्त स्वाभिमान जागून प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगितले.

प्रशिक्षणार्थी आचार्य विवेक पवार, वर्षा जळके, इंदिरा जळके, अस्मिता राऊत, वैष्णवी घरत, ललिता बुरेवार, रेखा आडे यांनी अनुभव कथन केले. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल कविता उगले, रंजना कुमरे, विभाष कोटनाके यांचा सत्कार करण्यात आला. संचालन घनश्याम राठोड यांनी केले. भरत तायडे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विभाष कोटनाके यांनी आभार मानले. संजय गावंडे, सचिन दूधकोहर, रवी दूधकोहर, पंकज गुरुनुले यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Acharya Study Camp at Ghatanji