तिहेरी हत्याकांडातील आरोपीला आर्णीत अटक
By Admin | Updated: October 31, 2015 00:27 IST2015-10-31T00:27:51+5:302015-10-31T00:27:51+5:30
येथील मच्छीपूल परिसरातील तिहेरी हत्याकांडातील एका आरोपीला शहर ठाण्याच्या शोध पथकाने आर्णीतून अटक केली.

तिहेरी हत्याकांडातील आरोपीला आर्णीत अटक
इतरांचा शोध सुरू : अटक संख्या झाली पाच
यवतमाळ : येथील मच्छीपूल परिसरातील तिहेरी हत्याकांडातील एका आरोपीला शहर ठाण्याच्या शोध पथकाने आर्णीतून अटक केली. आपसी वैमनस्यातून शनिवारी झालेल्या या हत्याकांडात तब्बल २२ आरोपी असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
जावेद अली उर्फ कबुत्तर (२५) रा. कुरेशीपुरा यवतमाळ असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. जावेद हा इकबालचा हस्तक म्हणून काम करीत होता. गुुरुवारी रात्री जावेद आर्णी येथे दडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी शिताफीने त्याला अटक केली. त्याने पोलिसांकडे घटनेची कबुली दिली असून शस्त्रे जप्ती आणि इतरही आरोपींची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
परस्पर विरोधी गटातील पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडले असले तरी यातील आरोपींची संख्या बरीच मोठी आहे. त्या तुलनेत केवळ पाच आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांची वेगवेगळी दोन पथके घेत आहे. एका पथकाने अटक केलेल्या दोन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)