अत्याचारप्रकरणातील आरोपीची आत्महत्या
By Admin | Updated: October 3, 2015 02:14 IST2015-10-03T02:14:13+5:302015-10-03T02:14:13+5:30
शहरालगतच्या डोर्ली येथील मतिमंद मुुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

अत्याचारप्रकरणातील आरोपीची आत्महत्या
मतिमंद मुलीचे अपहरण : मदत करणाऱ्यास अटक
यवतमाळ : शहरालगतच्या डोर्ली येथील मतिमंद मुुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तर सदर मुलीच्या अपहरणात मदत करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली.
नितेश पंडितराव चौधरी (२६) रा. भाग्यनगर असे मृताचे नाव आहे. तो अत्याचारप्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्याला वाजीद शेख (३५) रा. डोर्ली मतिमंद मुलीच्या अपहरणात मदत केली. डोर्ली येथील मतीमंद मुलगी मोहा येथील मुकबधीर विद्यालयात शिकायला होती. तिच्या शाळेला सुटी असल्याने ती घरी परत आली होती. शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी नितेशने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. वाजीद शेख याच्या दुचाकीने हे तिघे जण मोहदा येथील मूकबधिर शाळा परिसरात आले. आरोपीने शाळेच्या मागे असलेल्या शेतात कुकर्म केले. त्यानंतर तिला शाळेच्या आवारात सोडून पळ काढला. शाळेला सुटी असल्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या चौकीदाराला शंका आली. त्याने ही बाब शाळेतील शिक्षकाला सांगितली. शिक्षकाने सदर मुलीला तिच्या डोर्ली येथील घरी आणून सोडले. मुलीला मोहदा येथे कोणी सोडले याचा धक्काच घरच्या मंडळीला बसला. त्यांनी सदर मुलीकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. इतकेच नव्हे तर आरोपींची ओळखही पटविली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नितेश पंडितराव चौधरी आणि त्याचा सहकारी वाजीद शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला.
दरम्यान आरोपी नितेश चौधरी याने गावातीलच शेत शिवारात गळफास लावून आत्महत्या केली. तर आरोपी वाजीद शेख याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक मंगेश भोयर, शिपाई जाधव करत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)