पाणलोटमध्ये १३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
By Admin | Updated: June 14, 2015 02:52 IST2015-06-14T02:52:11+5:302015-06-14T02:52:11+5:30
पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पुसद वनविभागात झालेल्या १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी,

पाणलोटमध्ये १३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
पुसद : पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पुसद वनविभागात झालेल्या १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहीतीवरून ही तक्रार करण्यात आली असून यात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत २०१०-११ मध्ये पुसद वन विभागातील महागाव, उमरखेड आणि पुसद तालुक्यात १३ कोटींची करण्यात आली. त्यात दगडी बांध, समतल चर, मातीनाला बांध, ढाळीचे बांध, गाळ काढणे, जलशोषक चर, सिमेंट नालाबांध आदींचा समावेश आहे. कामाचे पैसे चेकद्वारे व रोखीने देण्यात आले. परंतु बहुतांश कामे मशीन लावून करण्यात आली. टीसीएमची म्हणजे चर कामांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आहे. ३० टक्के मजूर व ७० टक्के यंत्राचा वापर, अशी पद्धत आहे. परंतु या तत्त्वाला तिलांजली देत धुंदी, चिंचघाट, ब्रह्मी, राजना, सत्तरमाळ, पाथरवाडी, नागवाडी, जाम नाईक क्र.१, उपवनवाडी, जमशेटपूर, उडदी, मनसळ, रामपूरनगर येथे चौकशी केली असता सर्वसामान्य नागरिक या कामांपासून अनभिज्ञ आहे.
माहिती अधिकारांतर्गत गजानन महाजन यांना मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ पाणलोट समिती, पाथरवाडीला १० जुलै २००८ रोजी चार लाख ५० हजार रुपये, उपवाडी समितीला चार लाख ५० हजार रुपये जामनाईक समितीला एक लाख ८० हजार, आमदरी एक लाख ७० हजार, बोरगाव समितीने दोन लाख ६० हजार, धुंदी समितीने आठ लाख ४२ हजार, ब्रह्मी समितीने एक लाख रुपये, चिचघाट दोन लाख रुपये, राजना समितीने तीन लाख रुपये अशी बेसुमार उचल केल्याची नोंद आहे. २० आॅक्टोंबर २००८ रोजी धुंदी समितीने पाच लाख रुपये, बोथा एक लाख २५ हजार, जनुना समितीने पाच लाख रुपये, जामनाईक समितीने पाच लाख रुपये, २२ मे २००९ रोजी चिचघाट समितीने सहा लाख ५० हजार, हिवळणी तीन लाख रुपये, राजना येथील समितीने एक लाख ५० हजार, ३१ मे २०१० ला राजना येथील समितीने सात लाख ८० हजार, चिचघाट येथील समितीने पाच लाख ५० हजार, वडगाव समितीने सात लाख, २२ जून २०१० ला धुंदी समितीने पाच लाख ६४ हजार, ब्रह्मी समितीने दोन लाख ३० हजार, ३० जून २०१० ला पिंपळगाव समितीने २१ लाख ७९ हजार २६९ रुपये, जमशेटपूर समितीने तीन लाख रुपये, हौसापूर उडदी येथील समितीने सात लाख ९२ हजार, धुंदी समितीने ३३ लाख ९७ हजार, ब्रह्मी समितीने दहा लाख ८८ हजार, चिचघाट पाच लाख आठ हजार, इजनी समितीने ३२ लाख १३ हजार, पिंपळगाव उमरखेड समितीने नऊ लाख ४० हजार, वडगाव समितीने सहा लाख ७३ हजार, मनसळ समितीने २१ लाख आठ हजार तर राजना येथील समितीने नऊ लाख ३२ हजार, २० आॅगस्ट २०१० रोजी राजना समितीने १८ लाख ६५ हजार, राजनाथ समितीने चार लाख ५० हजार, राजना समितीने सहा लाख २० हजार, धुंदी समितीने एक लाख ७३ हजार, धुंदी समितीला दोन लाख ७४ हजार एवढी उलाढाल झाल्याची नोंद दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)