पोक्सोअंतर्गत आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST2021-08-20T04:48:41+5:302021-08-20T04:48:41+5:30

२० जुलै रोजी आरोपी सागर निवृत्ती मेश्राम रा.खैरगाव जवादे, ता.राळेगाव याने लग्नाचे आमिष दाखवून सराटी येथील एका १७ वर्षीय ...

Accused arrested under Pokso | पोक्सोअंतर्गत आरोपीला अटक

पोक्सोअंतर्गत आरोपीला अटक

२० जुलै रोजी आरोपी सागर निवृत्ती मेश्राम रा.खैरगाव जवादे, ता.राळेगाव याने लग्नाचे आमिष दाखवून सराटी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर सर्वत्र शोध घेतला. परंतु मुलगी न मिळाल्याने अखेर पोलिसात फिर्याद दाखल केली. गेल्या एक महिन्यापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. परंतु आरोपी हाती लागत नव्हता. परंतु बुधवारी पीडित मुलीचा फोन आईला आला आणि आरोपी मुलीसह रूंझा, ता.पांढरकवडा येथे वास्तवाला असल्याचे कळले. याबाबत मुलीच्या आईने मारेगाव पोलिसांना कळविले. मारेगाव पोलिसांनी पांढरकवडा पोलिसांच्या मदतीने मुलीसह आरोपी सागर निवृत्ती मेश्राम याला अटक केली. पोलिसांनी पीडित मुलीच्या बयाणावरून आरोपी सागरविरुद्ध भादंवि कलम ३७६ व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Accused arrested under Pokso