कोरोना प्रयोगशाळेत तब्बल ८८ हजार नमुन्यांची अचूक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:01 IST2021-02-15T05:00:00+5:302021-02-15T05:01:12+5:30

नागपूर, सेवाग्राम व अकोला येथील प्रयोगशाळेत दोन हजार १६१ नमुने तपासण्यात आले. त्यात १४६ पाॅझिटिव्ह तर एक हजार ८०० नमुने निगेटिव्ह आले. ५ मार्च ते २ जून या कालावधीत हे नमुने तपासणीला गेले. जुलै महिन्यापासून यवतमाळातील प्रयोगशाळेत नमुने तपासले जाऊ लागले. यामध्ये आतापर्यंत ८८ हजार २१ नमुने तपासण्यात आले आहेत. पैकी  १० हजार ६९३ नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 

Accurate testing of 88,000 samples at Corona Laboratory | कोरोना प्रयोगशाळेत तब्बल ८८ हजार नमुन्यांची अचूक तपासणी

कोरोना प्रयोगशाळेत तब्बल ८८ हजार नमुन्यांची अचूक तपासणी

ठळक मुद्देजुलै महिन्यापासून अविरत कामकाज : एम्सच्या पडताळणीमध्ये शंभर टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात मार्च २०२० मध्येच कोरोनाचा उद्रेक झाला. येथील रुग्णांचे नमुने तपासणीसाठी सुरुवातीला नागपूर येथे पाठविण्यात आले. नागपूरच्या आयजीएमसी व एम्स प्रयोगशाळेची मदत घेण्यात आली. नंतर नमुन्यांची संख्या वाढताच सेवाग्राम, अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीला नमुने जात होते. मात्र याचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना प्रयोगशाळा साकारण्यात आली. 
नागपूर, सेवाग्राम व अकोला येथील प्रयोगशाळेत दोन हजार १६१ नमुने तपासण्यात आले. त्यात १४६ पाॅझिटिव्ह तर एक हजार ८०० नमुने निगेटिव्ह आले. ५ मार्च ते २ जून या कालावधीत हे नमुने तपासणीला गेले. जुलै महिन्यापासून यवतमाळातील प्रयोगशाळेत नमुने तपासले जाऊ लागले. यामध्ये आतापर्यंत ८८ हजार २१ नमुने तपासण्यात आले आहेत. पैकी  १० हजार ६९३ नमुन्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. 
राज्यात दुसरा क्रमांक
यवतमाळातील कोरोना प्रयोगशाळा जुलै महिन्यापासून सातत्याने सुरू आहे. तेथील काही तंत्रज्ञ व स्टाफ कोरोना पाॅझिटिव्ह आला. मात्र त्यानंतरही काम थांबले नाही. एम्सकडून राज्यातील कोरोना प्रयोगशाळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये यवतमाळच्या प्रयोगशाळेचे निदान शंभर टक्के बरोबर आले. नागपुरातील प्रयोगशाळेनंतर यवतमाळातील प्रयोगशाळेने राज्यात बाजी मारली. त्यासाठी येथील विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी अविरतपणे दिलेली सेवाही महत्त्वाची आहे.
 

एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाही 
 प्रयोगशाळेच्या निर्मितीपासून आतापर्यंत तेथे कोरोनाचे ८८ हजारांवर नमुने तपासण्यात आले आहे. येथील आरटीपीसीआरच्या तपासणीमध्ये निघालेला अहवाल तंतोतंत बरोबर होता. एकाही अहवालात क्युरी आली नाही.

जिल्हा खनिज विकास निधीतून तरतूद 
 कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नमुने तपासणीसाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा नसल्याने अडचण होत होती. त्यामुळे तातडीने जिल्हा खनिज विकास निधीतून दीड कोटी रुपये देण्यात आले. हा निधी मिळताच तीन महिन्यात अद्ययावत अशी प्रयोगशाळा साकारण्यात आली. आता या ठिकाणी कोरोनाव्यतिरिक्त स्वाइन फ्लूसह इतरही विषाणूजन्य आजारांचे सहज निदान करता येणार आहे. ही प्रयोगशाळा जिल्ह्यासाठी भविष्यातील मोठी उपलब्धी आहे. विषाणूजन्य आजारांच्या तपासणी किटस्‌ उपलब्ध झाल्यास अचूक निदान करता येणार आहे.

 

Web Title: Accurate testing of 88,000 samples at Corona Laboratory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.