२५ गावांमधील खातेदारांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:52 IST2017-09-04T23:51:51+5:302017-09-04T23:52:20+5:30

परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे.

Account holders of 25 villages | २५ गावांमधील खातेदारांची कोंडी

२५ गावांमधील खातेदारांची कोंडी

ठळक मुद्देवडकी सेंट्रल बँक : अधिकारी वाचतात कारणांचा पाढा

मंगेश चवरडोल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : परिसराच्या २० ते २५ गावातील नागरिकांचे व्यवहार चालत असलेल्या वडकी येथील सेंट्रल बँकेचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. नागरिकांना गेली आठ-दहा दिवसांपासून या बँकेत येरझारा माराव्या लागत आहे. संपूर्ण दिवसभर ताटकळत राहूनही हाती पैसा पडत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.
वडकी येथे सेंट्रल बँक आॅफ इंडिया ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. मजुरांपासून ते व्यापाºयांपर्यंतचे खाते या बँकेत आहे. कुठल्याही व्यवहारासाठी या बँकेत अडथळे येत आहेत. निराधार लाभार्थ्यांचा आधार तुटला आहे. आवश्यक त्यावेळी त्यांना पैसे उपलब्ध होत नाही. बँकेतील काही अधिकारी आणि कर्मचारी त्यांना उद्धट वागणूक देत परत करतात. शेतकºयांना कर्जाचे पैसे कापले जाईल असे सांगून अडवणूक करतात. दहेगाव, पिंपरी, चहांद आदी गावातील शेतकरी खातेदारांचा हा अनुभव आहे.
लिंक नसल्याचे कारण सांगून व्यवहार थांबविले जाते. प्रिंटर बंद असल्याचे सांगून नोंदी करून दिल्या जात नाही. शेतकरी, व्यापारी, निराधार लाभार्थी, विद्यार्थी आदी घटक यामुळे त्रस्त झाले आहेत. झालेल्या तक्रारीवर कुठलीही कारवाई होत नाही.
उपचारासाठी पैसे नाही
दहेगाव येथील केशव सावरकर यांचे सेंट्रल बँकेच्या वडकी शाखेत खाते आहे. या खात्यातील रक्कम काढण्यासाठी गेले असता परत पाठविण्यात आले. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी पैशांची आवश्यकता असताना बँक अडवणूक करत आहे, असे केशव सावरकर यांनी सांगितले.

शाखेत ग्राहक संख्येच्या तुलनेत कर्मचारी कमी आहे. शिवाय लिंकची समस्या आहे. त्यामुळे ग्राहकांना तत्काळ सेवा देता येत नाही. वरिष्ठांकडे पुरेशा कर्मचाºयांची मागणी केली आहे.
- के.एच. बीडकर,
शाखा व्यवस्थापक,
सेंट्रल बँक आॅफ इंडिया, वडकी

Web Title: Account holders of 25 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.