यवतमाळ-नागपूर महामार्गावर अपघात; एक ठार, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:18 PM2019-09-05T16:18:30+5:302019-09-05T16:38:12+5:30

नागपूर रोडवर असलेल्या चापर्डा शिवारात गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास शिवशाही बस व मेटॅडोरच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली.

Accident on Yavatmal-Nagpur highway; One killed, 15 injured | यवतमाळ-नागपूर महामार्गावर अपघात; एक ठार, १५ जखमी

यवतमाळ-नागपूर महामार्गावर अपघात; एक ठार, १५ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देशिवशाही व मेटॅडोरची धडक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: नागपूर रोडवर असलेल्या चापर्डा शिवारात गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास शिवशाही बस व मेटॅडोरच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना घडली.
या मार्गावर असलेल्या चापर्डा येथे शिवशाही बस व मेटॅडोरमध्ये समोरासमोर धडक झाली व तीत मेटॅडोर चालक शंकर आलट (४५) रा. चाकूर, जि. लातूर याचा जागीच मृत्यू झाला. बसचालकासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत. या मार्गाच्या बांधकामाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी व अरुंद रस्ते याला वाहन चालकांना तोंड द्यावे लागते. अशातच वेगात आलेल्या या दोन वाहनांची धडक होऊन हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
 

Web Title: Accident on Yavatmal-Nagpur highway; One killed, 15 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात