अहिरांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
By Admin | Updated: November 19, 2016 01:31 IST2016-11-19T01:31:14+5:302016-11-19T01:31:14+5:30
केंद्रीय मंत्री ना.हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील डी.पी.गार्डच्या खासगी वाहनाला

अहिरांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
मारेगाव : केंद्रीय मंत्री ना.हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील डी.पी.गार्डच्या खासगी वाहनाला (क्रमांक एम.एच.३१-सी.ए.३६३९) यवतमाळकडे जात असताना करणवाडी-नरसाळा फाट्यावर अपघात झाला. यात वाहनाचा चालक जखमी झाला. समोरून येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
राजू दुल्हाराव ठाकरे (४६) रा.कामठी (नागपूर) असे जखमी वाहनचालकाचे नाव आहे. यवतमाळकडे जात असलेले ना.अहीर यांच्या ताफ्यातील वाहनात कोणीच नसल्याने जिवीतहानी टळली. अपघात होताच दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
गतिरोधक असते तर हा अपघात घडलाच नसता, असेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अपघातात जखमी झालेल्या वाहनचालकाला येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणीला हलविण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)