शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरवरून बुलडाणा येथे मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जण गंभीर

By सुरेंद्र राऊत | Updated: September 28, 2022 17:49 IST

चालकाचे नियंत्रण सुटले : बाभूळगाव-कळंब मार्गावरील घटना

बाभूळगाव (यवतमाळ) : अनियंत्रित झालेले वाहन कठडे तोडून पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर २६ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता बाभूळगाव-कळंब मार्गावरील नायगाव येथे घडली. जखमींवर यवतमाळ येथे उपचार केले जात आहे.

चंद्रपूर येथील ३० मजुरांना घेऊन पिकअप व्हॅन बुलडाणा येथे निघाली होती. कळंब मार्गे बाभूळगावकडे येत असताना नायगाव पुलावर पिकअप व्हॅन अनियंत्रित झाली. रस्त्याने चालत निघालेल्या तीन जणांना या व्हॅनने जोरदार धडक दिली. यानंतर हे वाहन ३० मजुरांसह पुलाचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळले. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर, जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. 

यदु मोतीराम जाधव (५५) नायगाव असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५) सुवर्णा विनायक लोनबले  (34), जोस्ना हेमराज हजारे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश  मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोनवले (35), डाकराम केवलराम बोरसे (३५), मोरेश्वर कालिदास गेडाम (३५), जयश्री यादव लोनवले (३०), निराशा हेमंत मडावी (३०), अशी जखमींची नावे आहेत.

घटना घडताच नायगाव येथील नागरिक मदतीला धावले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार रवींद्र जेधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, पोलीस कर्मचारी व होमगार्डचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मिळेल त्या वाहनाने आणि येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्सद्वारे सर्व जखमींना यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूYavatmalयवतमाळ