अपघातात कोळंबीचे माजी उपसरपंच ठार

By Admin | Updated: September 24, 2016 02:36 IST2016-09-24T02:36:45+5:302016-09-24T02:36:45+5:30

भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात यवतमाळ तालुक्यातील कोळंबीचे माजी उपसरपंच ठार झाले.

In the accident, the former deputy spray of shrimp killed | अपघातात कोळंबीचे माजी उपसरपंच ठार

अपघातात कोळंबीचे माजी उपसरपंच ठार

अकोलाबाजार : भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात यवतमाळ तालुक्यातील कोळंबीचे माजी उपसरपंच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पिंपरीबुटी गावाजवळ घडला.
शंकर हरिभाऊ वांढरे (५०) रा. कोळंबी असे मृताचे नाव आहे. तर भीमराव धर्मा धुर्वे (५०), राजू श्रावण गायकवाड (४०) दोघे रा. कोळंबी असे जखमींची नावे आहे. हे तिघे जण आपल्या दुचाकीने अकोलाबाजार येथून गुरुवारी सायंकाळी कोळंंबीकडे जात होते. पिंपरीबुटी गावाजवळ समोरुन येणाऱ्या अज्ञात दुचाकीने जबर धडक दिली. त्यात हे तिघेहे जखमी झाले. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शंकर वांढरे यांचा मृत्यू झाला. वांढरे यांच्या मागे पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)

Web Title: In the accident, the former deputy spray of shrimp killed