पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अवघा २0 टक्के जलसाठा

By Admin | Updated: August 12, 2014 21:06 IST2014-08-12T21:06:55+5:302014-08-12T21:06:55+5:30

पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने,

About 20 percent water stock in the Western Vidarbha dams | पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अवघा २0 टक्के जलसाठा

पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अवघा २0 टक्के जलसाठा

अकोला : पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने, या भागातील जलसाठय़ांची स्थिती गंभीर झाली आहे. हीच परिस्थिती राहीली तर, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती वगळता इतर चार जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने या विभागातील मोठय़ा, मध्यम, लघू प्रकल्पांची पातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता, तो आता १८.३४ दलघमीपर्यंंत घसरला आहे. या धरणातील जलसाठी २२ टक्क्यांहून घसरून २१ टक्क्यांवर आला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ३५ टक्के, निगरुणा २४ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहर पूरसंरक्षक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात गत आठवड्यात २२.७७ दलघमी जलसाठा होता. तो घसरू न २0.५३ दलघमी झाला आहे. ज्ञानगंगा प्रकल्पात ३९ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, या जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात ४६ टक्के, गोकी ३५ टक्के, वाघाडी ३५ टक्के, तर बोरगाव मध्यम प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा उरला आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाचीही गंभीर अवस्था आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्यावर पोहोचली असून, उमा प्रकल्पात १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील वाण धरणात मात्र ७८ टक्के आणि पोपटखेड धरणात ८३ टक्के, तर यवतामाळ जिल्हय़ातील लोअरपूस या प्रकल्पामध्ये ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.

Web Title: About 20 percent water stock in the Western Vidarbha dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.