अभ्यंकरच्या चौघींची राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:44 IST2019-05-13T21:44:16+5:302019-05-13T21:44:34+5:30
सीकर (राजस्थान) येथे १५ मेपासून सुरू होणाऱ्या नवव्या सबज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील चार खेळाडूंनी विदर्भ महिला हॉकी संघात स्थान पटकाविले आहे.

अभ्यंकरच्या चौघींची राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनसाठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सीकर (राजस्थान) येथे १५ मेपासून सुरू होणाऱ्या नवव्या सबज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील चार खेळाडूंनी विदर्भ महिला हॉकी संघात स्थान पटकाविले आहे.
विदर्भ हॉकी असोसिएशनने नागपूर येथे घेतलेल्या निवड चाचणीतून विदर्भ महिला हॉकी संघ निवडण्यात आला. या चाचणीत विदर्भाच्या ११ जिल्ह्यातून यवतमाळच्या सात खेळाडूंसह ९० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. तनुश्री कडू, शीतल जाधव, जान्हवी पाटील व साक्षी रावत या चार खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सदर चारही खेळाडू येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या विद्यार्थिनी तर, जिल्हा हॉकी असोसिएशन व आकाश चिकटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश चिकटे, मार्गदर्शक शाहीद सैयद, जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव मनोहर भटकर, देवेंद्र चपेरिया, क्रीडा शिक्षक अविनाश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.