अभिजितचा खून पतंगाच्या वादातून, खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 04:57 AM2017-10-21T04:57:30+5:302017-10-21T04:58:09+5:30

केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

 Abhijit's murder was a fight between the moth, the success of the police, to uncover the mystery of the murder | अभिजितचा खून पतंगाच्या वादातून, खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश

अभिजितचा खून पतंगाच्या वादातून, खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश

Next

यवतमाळ : केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. हा खून पतंगाच्या क्षुल्लक कारणातून झाल्याचे निष्पन्न झाले. तीन विधीसंघर्ष बालकांनी नशेच्या अंमलात हे कृत्य केल्याचे पोलिसांपुढे कबूल केले. यासोबत सूरजनगर परिसरात बालकांमधील नशेचे धक्कादायक वास्तवही पोलिसांनी समाजापुढे आणले आहे.
अभिजित दीपक टेकाम (१२) रा. डेहणकर ले-आऊट यवतमाळ, या बालकाचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी पोलिसांना आढळून आला होता. घटनेनंतर सातव्या दिवशी खुनाचे रहस्य उलगडण्यात उपविभागीय पोलीस अधिकार पीयूष जगताप यांच्या नेतृत्वातील विविध पथकांना यश आले. यात पोलिसांनी तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अभिजित हा शुक्रवारी सायंकाळी ट्युशनवरून परत येत होता. तेव्हा त्याला कटलेली पतंग दिसली. ही पतंग मिळविण्यासाठी तो झुडपी जंगल परिसरात गेला. मांजा गुंडाळत असताना तिघांनी त्याच्या जवळचा पतंग हिसकावून घेतला. अभिजितने विरोध करताच नशेच्या अंमलात असलेल्या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. यात अभिजित बेशुद्ध पडला. नंतर त्याला ओढत नेऊन सागाच्या झुडपात टाकले. तिघेही एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी सलग तिनदा अभिजितच्या डोक्यावर मोठा दगड टाकला. यात अभिजित जागीच गतप्राण झाला. त्यानंतर तिघेही घराकडे निघून गेले.

अभिजित शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापासूनच बेपत्ता होता. तो शिकवणीला गेल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रारी दिली. मात्र दुसºया दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांपुढे मारेकरी शोधण्याचे आव्हान होते. सुरूवातीला पोलिसांनी या परिसरात भटकणाºया तरूणांवर लक्ष केंद्रीत केले. या भागात नशा करण्यासाठी अनेक जण येत असल्याचे सांगण्यात येत होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि सहा दिवसानंतर अभिजितचे मारेकरी सापडले. हा आव्हानात्मक तपास पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पाच पथकांनी केला. त्यात टोळी विरोधी पथकाचे प्रशांत गिते, संतोष मनवर, वडगाव रोड शोध पथकाचे सुगत पुंडगे, गोरख चौधर, स्थानिक गुन्हे शाखेतील सारंग मिराशी यांच्यासह ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, आकाश मसनकर, शशिकांत चांदेकर, सूरज गजभिये, जयंत शेंडे, शंकर भोयर यांचा समावेश आहे.

Web Title:  Abhijit's murder was a fight between the moth, the success of the police, to uncover the mystery of the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.